लासोना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा विद्यार्थी विमानात बसून सहलीला जाणार
देवणी (रणदिवे लक्ष्मण) : तालुक्यातील लासोना ग्रामपंचायत कार्यालय वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम शिवाजी महाराज चौक येथे घेण्यात आला.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लासोनाचा विद्यार्थी देवव्रत रमेश माने इयत्ता ७ वी जिल्हा स्तरावरून परीक्षेद्वारे इस्रो अवकाश संशोधन केंद्र, श्रीहरीकोटा बंगळूर, आंध्रप्रदेश, केरळ या ठिकानी जाण्यासाठी निघालेल्या सहली साठी निवड झाली आहे, त्याचा विमानाने प्रवास अणि संपुर्ण खर्च सरकार करणार आहे. अशा फक्त ३० विद्यार्थ्यांची निवड पूर्ण जिल्ह्यातून झाली आहे. त्यापैकी एक लासोना गावातील आहे, म्हणून आपल्या गावाचे नाव संपुर्ण महाराष्ट्र व देशात पोहचवनारा देवव्रत माने याचा सत्कार करण्यात आला.तसेच प्रशांत गोपाळ हूलसुरे हा विध्यर्थी सरकारी कोठ्यातून B A M S साठी निवडला गेला आहे, म्हनुण दोन्ही विद्यार्थी व माता पालक यांचा सन्मान व सत्कार छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आला.
या वेळी सरपंच धनराज मठपती, उपसरपंच अंकुश माने, ग्रामसेवक कुटे, दिलीप माने, संताजी माने, नागोराव अंगनवाडीताई गावातील नागरिक, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
