अभ्यासात सातत्य असेल,तर स्पर्धा परीक्षेत यश – डॉ.महेश मोरे

अभ्यासात सातत्य असेल,तर स्पर्धा परीक्षेत यश - डॉ.महेश मोरे

उदगीर (एल.पी.उगीले) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता खूप मोठ्या प्रमाणातअसते. परंतु हे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात. आशावाद मनी बाळगून अभ्यासात सातत्य ठेवल्यास स्पर्धा परीक्षेतील यश खेचून आणता येते, असे विचार डॉ. महेश मोरे यांनी मांडले.श्री हावगीस्वामी महाविद्यालयातील व्यवसाय मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षा समितीच्यावतीने ध्यास यशाचा या शीर्षकाखाली ऑनलाईन व्याख्यानमाचे आयोजन करण्यात आले होते. पहिले पुष्प लातूर येथील राजमुद्रा अकॅडमीचे संचालक डॉ.महेश मोरे यांच्या हस्ते गुंफण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.एन.जी. एमेकर उपस्थित होते. प्रास्ताविक समितीचे प्रमुख डॉ. एल. के.उलगडे तर परिचय डॉ.म.ई.तंगावार यांनी करून दिला.

स्पर्धा परीक्षेचे बदलते स्वरूप या विषयावर बोलताना पुढे डॉ.मोरे म्हणाले, स्पर्धा परीक्षेची तयारी लक्ष दिल्यास खऱ्या अर्थाने पदवी स्तरावरच चांगल्या प्रमाणे होत असते. महाविद्यालयात शिकत असताना विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाकडे दुर्लक्ष करता कामा नये. महाविद्यालयातील विविध उपक्रमात विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा. याच उपक्रमातून प्रेरणा व दिशा मिळते.

यावेळी त्यांनी स्पर्धा परीक्षा ही आजच्या काळात विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी कशी आहे? हे सांगत स्पर्धा परीक्षेतील वेगवेगळ्या पदासाठीचा अभ्यास कशा पद्धतीने करावा? या संदर्भात त्यांनी विस्ताराने माहिती दिली.अध्यक्षीय समारोपात प्र.प्राचार्य डॉ. एन.जी.एमेकर म्हणाले, अशा कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमधील नकारात्मकता नष्ट होते. स्पर्धा परीक्षा ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी शिकत असताना स्पर्धा परीक्षेची तयारी करावी. यामुळे भविष्यात आत्मविश्वास वाढत जाईल.गूगल मीटद्वारे आयोजित ऑनलाईन व्याख्यानास उपप्राचार्य डॉ.आप्पाराव काळगापुरे, प्राध्यापक व साठ ते सत्तर विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.जे.डी.संपाळे तर आभार प्रा.मनोहर भालके यांनी मानले.

About The Author

error: Content is protected !!