हिंदू सण उत्साहात साजरे करा – ह.भ.प.कैलास महाराज लिंगधाळकर

हिंदू सण उत्साहात साजरे करा - ह.भ.प.कैलास महाराज लिंगधाळकर

उदगीर (एल.पी.उगीले) : समाजात वावरत असताना आपल्या हिंदू सणांचा मात्र विसर पडताना दिसत आहे.असे न होता, आपले सन उत्साहाने साजरे करावेत, आता गुडीपाडव्या नंतर रामनवमी येत आहे. त्यामुळे राम नवमी ची तयारी करूण उत्साहात साजरी करावी.असे विचार ह.भ. प. कैलास महाराज यांनी व्यक्त केले,ते श्री समर्थ धोंडुतात्या महाराज यांच्या 91 व्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आयोजित सप्ताहात संत श्रेष्ट तुकाराम महाराज यांच्या गाथ्यातील अभंग,”श्री संताचीये माथा चरणावरी…… !”सादर करतांना ह.भ.प.कैलास महाराज लिंगदाळकर यांनी सांगितले. पुढे आपल्या सुंदर वाणीतून भावीकांना मार्गदर्शन करत नव्या पिढीला गुढी कशी उभारावी? याची माहिती सांगितली, आजच्या पिढीला धार्मिक बाबीची माहिती कमी असलेली दिसून येते. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी घरोघरी गुढी उभारण्याचा कार्यक्रम केला जातो. यासाठी घरातील सर्वजण लवकर उठून गुढी उभारण्याची तयारी करतात. एक उंच बांबूच्या काठीला धुवून स्वच्छ केले जाते. त्याला रेश्मी साडी अथवा वस्त्र नेसवून त्यावर चांदीचा अथवा तांबे धातूचा तांब्या, कडूलिंब, आंब्याची पाने, साखरेची माळ, फुलांचा हार बांधून सजवले जाते. घराच्या दारात अथवा खिडकीत गुढी उभारण्यात येते.गुढी हे स्नेहाचे,मांगल्याचे, उत्साहाचे आणि आनंदाचे प्रतिक मानले जाते.ज्यामधून विजय पताका उभाल्याचा आनंद व्यक्त होत असतो. घराबाहेर रांगोळी काढली जाते, व आई वडिलांना व वडीलधाऱ्यांना नमस्कार करून आशीर्वाद घेतला जातो. अशा उत्साहात मराठी नव वर्ष साजरे केले जाते असे मार्गदर्शन करून आपली किर्तन रूपी सेवा केले. यावेळी डोंगरशेळकी पंचक्रोषितील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!