शिवाजी महाविद्यालयात शहीद दिन साजरा
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील शिवाजी महाविद्यालयात शहीद दिन साजरा करण्यात आला. भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांच्या आठवणीचे स्मरण करण्यात आले. यावेळी प्रभारी प्राचार्य डॉ. आर एम मांजरे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेले कार्य व त्यांनी दिलेले बलिदान यावर प्रकाश टाकण्यात आला. व त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील प्रबंधक बी के पाटील, गुरुनाळे व्हि डी, लाडके आर एम तसेच प्राध्यापक ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम जयंती समितीच्या वतीने घेण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रोफेसर डॉ शिंदे एस व्ही यांनी तर आभार डॉ सी जे देशमुख यांनी मानले.
