आ. रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते लक्ष्मी नरसिंह ज्वेलर्सचा शुभारंभ
लातूर (एल.पी.उगीले) : भारतीय जनता पार्टीचे अमोल पाटील यांचे चिरंजीव अमरसिंह पाटील यांनी नव्याने सुरू केलेल्या लक्ष्मी नरसिंह ज्वेलर्स या व्यवसायाचा शुभारंभ भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आला. यावेळी औसा मतदार संघाचे आ. अभिमन्यू पवार यांची उपस्थिती होती. लातूर येथील सराफ लाईन लोखंड गल्ली भागात नव्याने सुरू झालेल्या या लक्ष्मी नरसिंह ज्वेलर्सच्या शुभारंभ कार्यक्रमास प्रदेश भाजपाचे शैलेश लाहोटी, जिल्हा सरचिटणीस विक्रमकाका शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष भागवत सोट, भीमाशंकर राचट्टे, सुनील उटगे, अँड. दशरथ सरवदे, वसंत करमोडे, महिंद्र गोडभरले, जगदीश कुलकर्णी, मनोज कराड, बाबू खंदाडे, राजकिरण साठे, दीपक वांगस्कर, अनंत कोरे, राहुल पाटील, महेश कौळखरे, प्रताप पाटील, भागवत कांबळे, मोहित पाटील, चंद्रकांत कातळे, लक्ष्मण खंलग्रे, शेख निजाम यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. याप्रसंगी अमोल पाटील आणि अमरसिंह पाटील यांनी मान्यवरांचा सत्कार करून स्वागत केले.
