जन्मभूमीत रुग्णसेवा देण्याचे भाग्य मोठे असते – डॉ. योगेश मरलापल्ले

जन्मभूमीत रुग्णसेवा देण्याचे भाग्य मोठे असते - डॉ. योगेश मरलापल्ले

उदगीर (एल.पी.उगीले) : आपली जन्मभूमी आणि कर्मभूमी या ठिकाणी गोरगरिबांची सेवा करून त्यांचे आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी केलेली सेवा निश्चितच मनाला आनंद देणारी असते. सध्याच्या धावपळीच्या जगात गरीब, श्रीमंत, सर्वसामान्य, सर्वांचीच जीवनशैली बदलली असल्यामुळे वेगवेगळे रोग आणि व्याधी निर्माण होऊ लागल्या आहेत. खानपानातील बदल, त्यासोबतच ताणतणाव आणि या धावपळीत ऍलोपॅथी सारखी औषध प्रणाली, यामुळे ही माणसांचे आरोग्य साईड इफेक्ट मुळे खराब होऊ शकते, ही शक्यता विचारात घेऊन आयुर्वेदिक पद्धतीने निदान व उपचार शिबिराचे आयोजन उदगीर तालुक्यातील डोंगरशेळकी येथे श्री समर्थ धोंडू तात्या महाराज संस्थान या ठिकाणी सुरू असलेल्या सप्ताहाच्या दरम्यान श्री वारकरी आयुर्वेद तर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरात आयुर्वेदिक पद्धतीने तपासणी व मोफत औषधी देण्यात आल्या. आपल्या परिसरातील नागरिकांना सेवा दिल्याबद्दल आपल्याला आनंद झाला. असे विचार डॉक्टर योगेश मरलापल्ले यांनी व्यक्त केले. या शिबिरात 264 रुग्णांनी आरोग्य तपासणी आणि मोफत औषधी उपचार करून घेऊन या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिरामध्ये अग्निकर्म, विध्दकर्म चिकित्सा करण्यात आली. या भागातील नागरिकांना अग्नीविध्ध्द हे किती महान आहे, याचा अनुभव आला. या शिबिरात डॉक्टर गोगटे, देशमुख यांच्यासह सहयोगी प्रतीक्षा, शितल, विशाल, सिद्धेश्वर या सहकाऱ्यांनीही मोठ्या प्रमाणात सहकार्य केल्याचे याप्रसंगी डॉक्टर योगेश मरलापल्ले यांनी स्पष्ट केले. या आयुर्वेदिक आरोग्य शिबिराचा लाभ परिसरातील भाविक भक्तांनी आणि रुग्णांनी घेतला.

About The Author

error: Content is protected !!