सेनेची छत्रपती संभाजीनगर येथील सभा ऐतिहासिक होणार – कैलास पाटील
लातूर (एल.पी.उगीले) : छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित सेनेची सभा भव्य दिव्य आणि ऐतिहासिक व्हावी, यासाठी शिवसेनेची मराठवाड्याची तोफ माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर येथे शिवसेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची बैठ संपन्न झाली. या बैठकीसाठी शिवसेनेच्या नेत्या सुषमाताई अंधारे, युवा नेते शरद कोळी, लातूर जिल्हाप्रमुख बालाजी भाऊ रेड्डी यांच्यासह उपतालुका प्रमुख महेश फुले, गोविंद आण्णा बेंबडे, शहर संघटक संजय मतपती, शिक्षक सेना तालुकाप्रमुख तातेराव मुंडे, वाहतूक सेना तालुकाप्रमुख शरद सावरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीतूनच संभाजीनगर येथील शिवसेनेची सभा ही ऐतिहासिक करण्याचा संकल्प निष्ठावंत शिवसैनिकांनी केला असल्याची माहिती शिवसेनेचे उदगीर तालुकाप्रमुख कैलास पाटील यांनी दिली.
लातूर जिल्ह्यातील सर्व निष्ठावंत शिवसैनिकांनी याप्रसंगी आवर्जून उपस्थिती नोंदवली होती. मोठ्या संख्येने या सभेसाठी शिवसैनिक जाणार असून छत्रपती संभाजी नगर येथील सभा ऐतिहासिक ठरेल. असा विश्वासही याप्रसंगी कैलास पाटील यांनी व्यक्त केला. या बैठकीसाठी आलेल्या सर्व निष्ठावंत शिवसैनिकांना माजी खासदार चंद्रकांत खैरे, शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मार्गदर्शन केले. मोठ्या जिद्दीने आणि सर्व ताकतीने येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसैनिकांनी लढावे, आपली लढाई आता जिंकण्यासाठीच आहे. ही जिद्द बाळगावी, असेही मार्गदर्शन केले.
