तालुका पत्रकार संघाची सदस्य नोंदणी सुरु
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर तालुका पत्रकार संघाची सन २०२२-२०२३ची सदस्य नोंदणी सुरु झाली असुन उदगीर शहर व तालुक्यातील पत्रकारांनी सदस्य नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन पत्रकार संघाच्यावतीने करण्यात आले आहे.
अखिल भारतीय पत्रकार परिषदेशी सलंग्नित असलेल्या उदगीर तालुका पत्रकार संघाची सन २०२२-०२०२३ ची सदस्य नोंदणीची अंतिम तारिख दि.३१ मार्च २०२३ पर्यंत राहणार आहे. वार्षिक नोंदणी शुल्क ५००रुपये (अक्षरी पाचशे रुपये) असणार आहे.सदस्य नोंदणीसाठी पत्रकार संघाच्या विहित नमुन्यातील फाॅर्म भरुन वर्षभरातील किमान तिन बातमी नावानिशी प्रकाशित झालेली असली पाहीजेत, व त्याची छायांकित प्रत,ओळख पत्राची छायांकित प्रत जोडणे अवश्यक आहे. सलग तीन वर्ष सदस्य नोंदणी झाल्यानंतरच कायम सदस्यता प्राप्त होणार आहे. त्यानंतरच मतदान प्रक्रियेत भाग घेता येणार आहे.
पत्रकार संघाचे संपर्क कार्यालय दैनिक यशवंत विभागिय कार्यालय ,नगर परिषद व्यापारी संकुल उदगीर येथे सदस्य नोंदणी होत असुन उदगीर शहर व तालुक्यातील पत्रकारांनी आपली सदस्य नोंदणी करुन घ्यावी. असे आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष राम मोतीपवळे, सचिव दयानंद बिरादार,कोषाध्यक्ष रोशन मुल्ला,कार्याध्यक्ष एल.पी.उगीले यांनी केले आहे.
