कृषि पायाभूत सुविधा निधी योजनेंतर्गत जिल्हास्तरीय कृती संगम कार्यशाळा उत्साहात

कृषि पायाभूत सुविधा निधी योजनेंतर्गत जिल्हास्तरीय कृती संगम कार्यशाळा उत्साहात

लातूर (एल.पी.उगीले) : कृषि पायाभूत सुविधा निधी योजना अंतर्गत जिल्हास्तरीय कृती संगम कार्यशाळा व प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांतर्गत खरेदीदार विक्रेता संमेलन हॉटेल ग्रँड येथे पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल होते.जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, आत्माचे प्रकल्प उपसंचालक रविंद्र पाटील, कृषि पायाभूत सुविधा निधी योजनेचे राज्य समन्वयक मेघनाथ कांबळे, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक प्रमोद पाटील, कृषि विकास अधिकारी सुभाष चोले, उपविभागीय कृषि अधिकारी आर. टी. जाधव, महेश क्षीरसागर, कृषि उपसंचालक श्वेता गिरी, मांजरा कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सचिन दिग्रसे उपस्थित होते. प्रास्ताविकात दत्तात्रय गावसाने यांनी कृषि विषयक विविध योजना त्यामध्ये पायाभूत सुविधा निधी योजना व प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी, शेतकरी गटाने, उत्पादक कंपनीने लाभ घ्यावा. विविध उद्योग उभारावेत. यासाठी बँक, कृषि विभाग व त्यासोबतची यंत्रणा आपल्या सोबत सदैव तत्पर राहील, असे त्यांनी सांगितले.कृषि पायाभूत सुविधा निधी योजनेबाबत नाबार्डच्या विविध योजनेची माहिती नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक प्रमोद पाटील यांनी दिली. राज्य समन्वयक मेघनाथ कांबळे यांनी कृषि पायाभूत सुविधा निधी योजनेची सविस्तर माहिती दिली. यामध्ये विविध योजना त्यासाठी लागणारे अनुदान, त्यामध्ये बँकेचे सहकार्य याबाबत सविस्तर अशी माहिती दिली.सनदी लेखापाल भैरवनाथ मराठे, रमेश चिल्ले यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन कृषि पर्यवेक्षक सूर्यकांत लोखंडे यांनी केले, प्रकल्प उपसंचालक रविंद्र पाटील यांनी आभार मानले. जिल्ह्यातील कृषि विभागातील अधिकारी, बॅंकचे जिल्हा प्रतिनिधी, महिला शेतकरी, शेतकरी गट, उत्पादक कंपनी, उद्योजक, तालुका तंत्र व्यवस्थापक, जिल्हा संसाधन व्यक्ती उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!