उदगीर नगर परिषद व जळकोट नगरपंचायतीसाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत ५ कोटी रुपयाचा निधी मंजूर

उदगीर नगर परिषद व जळकोट नगरपंचायतीसाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत ५ कोटी रुपयाचा निधी मंजूर

उदगीर (एल.पी.उगीले) : राज्यातील नगर परिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान देण्यात येते, सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने ‘वैशिष्ट्यपूर्ण’ योजनेअंतर्गत आ. संजय बनसोडे यांच्या प्रयत्नातून उदगीर नगर परिषदेसाठी ३ कोटी ४० लक्ष रुपये तर जळकोट नगरपंचायतीसाठी १ कोटी ६० लक्ष रुपये असे उदगीर आणि जळकोट साठी एकुण ५ कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती माजी मंत्री तथा उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आ. संजय बनसोडे यांनी दिली आहे.या योजनेअंतर्गंत उदगीर येथील नळेगाव – लातूर रोड वरील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराचे बांधकाम करण्यासाठी तब्बल 1 कोटी रुपये तर उदगीर शहरातील शरदचंद्र पवार धर्मशाळा बांधकाम करणे 50 लक्षरुपये, उदगीर येथे छत्रपती शाहू महाराज पुतळा उभारणे व सुशोभीकरणासाठी 40 लक्ष रुपये, उदगीर शहरातील मुसा नगर येथे सभागृह बांधकाम करण्याकरिता 50 लक्ष रुपये, दबीपुरा येथील मुस्लिम समशान भूमीसाठी संरक्षण भिंत बांधकाम करण्याकरिता 25 लक्ष रुपये, शहरातील सात सैलानी कब्रस्तानसाठी संरक्षण भिंत बांधकाम करण्याकरिता 25 लक्ष रुपये, उदगीर नगर परिषद हद्दीतील उदगीर येथील हजरत सय्यद चाँद दर्गा कडे जाणारा रस्ता, संरक्षण भिंत बांधकाम करणे व सुशोभीकरण करणे यासाठी 25 लाख रुपये तर कासिमुल उलूम, कुतबेकदन चौक, जळकोट रोड, उदगीर या शाळेसाठी संरक्षण भिंत बांधकाम व अंतर्गत सीसी रोड व नाली बांधकाम करणे यासाठी 25 लाख रुपये असे एकूण 50 लक्ष रुपये असा एकुण 3 कोटी 40 लक्ष रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जळकोट येथील नगरपंचायतीच्या हद्दीतील जळकोट शहरातील लक्ष्मीपती बालाजी मंदिर सभागृह बांधकाम करण्याकरिता 50 लक्ष रु, जळकोट येथे लिंगायत भवन बांधकाम करण्याकरिता एक कोटी रुपये, जळकोट येतील मुस्लिम तांबोळी समशानभूमीसाठी संरक्षण बिन बांधकाम करण्याकरिता दहा लाख रुपये असे एकूण एक कोटी साठ लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. उदगीर नगर परिषद व जळकोट नगरपंचायतीसाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत 5 कोटी रुपयाचा निधी मंजूर केल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आ. संजय बनसोडे यांनी आभार व्यक्त केले आहेत.

About The Author

error: Content is protected !!