जळकोट तालुक्यातील उमरगा (रेतू) पाटी जवळ अपघात 2 मयत, 3 व्यक्ती गंभीर ; पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केली जखमीची विचारपूस
लातूर (एल.पी.उगीले) : जळकोट तालुक्यातील उमरगा रेतू, पाटी जवळ ट्रॅव्हल आणि ट्रॅक्टर चा अपघात झाला. त्यात ट्रॅव्हल मधील एकूण दोन व्यक्ती मयत झाले असून, इतर ०३ व्यक्ती गंभीर जखमी आहेत. तर १५ व्यक्ती किरकोळ जखमी आहेत. या घटनेची दखल घेऊन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी अधिवेशन काळात मुंबईवरून व्हिडीओ कॉल करून जखमीची विचारपूस केली. त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला यावेळी दिल्या. या किरकोळ जखमी व्यक्तींना प्राथमिक आरोग्य केंद्र हाडोळती, वांजारवाडा येथे उपचार घेतले. त्यात गोविंद वामन सोनकांबळे (तिरुका, ता. जळकोट), संतोष भालेराव (व्होंडाला,मुखेड) उपचार घेत आहेत. तर लातूर येथील सह्याद्री हॉस्पिटल मध्ये माधव तुकाराम डुकरे (हाथरणी, अहमदपूर), बालाजी त्रंबक रेकडगेवर (मांडणी, अहमदपूर), मारोती बाबू इरबनवाड (मांडणी) हे उपचार घेत आहेत . या अपघातात निवृत्ती गणपती नरवटे अंदाजे वय 58 वर्ष आणि पार्थवी विष्णुदास नरवटे अंदाजे वय 6 महिने दोघे मयत झाले आहेत. हे दोघेही रा. कोळणुर ता. जळकोट येथील एकच कुटुंबातील आहेत.अपघात स्थळी उमरगा रेतु, हाडोळती येथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात जखमी व्यक्ती यांना मदत केली.हा अपघात झाल्यानंतर अपघात स्थळी जळकोटचे पोलीस निरीक्षक आणि त्यांची टीम पोहचून रस्ता खुला करून दिला.तहसीलदार सुरेखा स्वामी आणि त्यांची टीम यांनी जखमी झालेले रुग्ण यांना हडोळती प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन भेट दिली.
