शास्त्री विद्यालयात वासंतिक वर्गाचे उद् घाटन संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील लालबहादूर शास्त्री विद्यालयात इयत्ता नववी मधून दहावीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा पालक मेळावा व वासंतिक वर्गाचे उद्घाटन संपन्न झाले. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष सतनप्पा हुरदळे ,तर प्रमुख अतिथीस्थानी पालक प्रतिनिधी रफिकोद्दीन मुंजेवार, स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष मधुकरराव वट्टमवार,कार्यवाह शंकरराव लासूणे, षन्मुखराव मठपती,अँड.शिवाजी बिरादार, परमानंद निलंगे, मुख्याध्यापक अंबादास गायकवाड उपस्थित होते.यावेळी दहावी प्रमुख रामेश्वर मलशेट्टे यांनी प्रास्ताविकातून वर्षभरातील अभ्यासक्रम , वासंतिक वर्ग व सराव परीक्षांचे नियोजन सविस्तरपणे मांडले. रफिकोद्दीन मुंजेवार, अश्विनी भांगे,शोभा तांदळे, नरेश बिरादार या पालकांनी आपल्या मनोगतातून शाळेकडून असलेल्या अपेक्षा व्यक्त करत पालक म्हणून शाळेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे नमूद केले.
शिक्षक मनोगतातून विज्ञान शिक्षिका सविता कोरे यांनी पालकाची भूमिका विशद केली, संस्कृत शिक्षक किरण नेमट यांनी विद्यार्थ्यांची शिस्त ,सवयी व आरोग्य या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. उपमुख्याध्यापक संजय कुलकर्णी यांनी पालकांना संबोधित करताना विविध उदाहरणे देत पाल्यांवर दबाव न देता त्याच्या व्यक्तिमत्त्वाला समजून घेऊन खेळीमेळीत वाढवावे असे सूचविले. मुख्याध्यापक अंबादास गायकवाड यांनी दहावीच्या वर्गासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे जाहीर केले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना सतनप्पा हुरदळे यांनी विद्यार्थी व शाळा यामधील महत्त्वाचा दुवा पालक असल्याचे सांगत आपल्या पाल्यांच्या उज्वल भवितव्यासाठी सकारात्मक दृष्टीने शाळेला सहकार्य करण्याचे आवाहन केले.सूत्रसंचालन दहावी सहप्रमुख लक्ष्मी चव्हाण यांनी केले. तर आभार एकनाथ राऊत यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पर्यवेक्षक बलभीम नळगीरकर ,लालासाहेब गुळभिले,माधव मठवाले,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
