जिल्हा परिषदेला पंतप्रधान पुरस्कार जाहीर, मानकऱ्याचे हार्दिक अभिनंदन – आ. कराड

जिल्हा परिषदेला पंतप्रधान पुरस्कार जाहीर, मानकऱ्याचे हार्दिक अभिनंदन - आ. कराड

लातूर (एल.पी.उगीले) : गेल्या निवडणुकीत जिल्ह्यातील जनतेने भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात लातूर जिल्हा परिषदेची सत्ता ताब्यात दिली, आणि पाच वर्षात गोरगरीब सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेतले. ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक योजना राबविन्यात आल्या. झालेल्या या कामाची पावती म्हणून केंद्र शासनाचा पंतप्रधान पुरस्कार लातूर जिल्हा परिषदेला जाहीर झाला. हा संपूर्ण जिल्हावाशियांचा सन्मान आहे. असे विचार भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी बोलून दाखविले.

जिल्हा परिषद ही स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाचे आणि सर्व दुर्बल व गरजू घटकांना न्याय देण्याचे केंद्र असून जिल्ह्यातील जनतेनी भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात जिल्हा परिषद दिल्याने तळागाळातील गरजूंना न्याय देण्याची भूमिका घेतली. जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमधून उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न केला. अत्यावश्यक सुविधा, लहान-सहान आजारांवरील उपचार, आरोग्य केंद्रांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी लातूर जिल्हा परिषद कायम प्रयत्न झाला आहे. ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळेच केंद्र सरकारकडून पंतप्रधान पुरस्कार लातूर जिल्हा परिषदेला जाहीर झाला हा सन्मान जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे , उपाध्यक्ष भारतबाई साळूंके सर्व सभापती आणि जिप सदस्य, अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या कामाचा गौरव आहे. सर्व बांधवांच्या सेवाभावनेचा एकप्रकारे गौरव आहे. या सर्वांचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी मनपूर्वक अभिनंदन केले आहे.

About The Author

error: Content is protected !!