आ. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते सिमेंट रस्त्याचा भूमिपूजन सोहळा संपन्न
अहमदपूर (गोविंद काळे) : आमदार स्थानिक विकास निधीतून १० लक्ष रुपयांच्या सिमेंट रस्त्याचा भूमिपूजन सोहळा मौजे सावरगाव थोट ता.अहमदपूर येथे आज आमदार बाबासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला. यावेळी विकास कामाची भूमिपूजन करत स्थानिक ग्रामस्थांशी आमदार यांनी संवाद साधत केलेल्या सन्मानाचा स्वीकार केला.प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष अनुपमाताई खंदारे, शिवानंदतात्या हेंगणे, निवृत्तीराव कांबळे, माधवराव जाधव, ॲड. टी.एन कांबळे, महेश हंबीर, शिवाजीराव पवार, प्रमोद पवार, चंद्रकांत गंगथडे, शिवणखेड सरपंच करीमभाई सौदागर, शरदजी पवार, विजय पवार, परमेश्वर तिरकमटे, शिवशंकर जावडे, महेश पाटील, काशिनाथ होनराव पाटील, मोहन पाटील, शिवानंद खंदारे, मोहन खंदारे, मनोज खंदारे, शार्दुल शेख, शार्दुल पिंजारी, नवनाथ शेळके, रुपेश कोरनुळे, स्वामी संगमेश्वर, साई खंदारे, गणेश मनोरे, वाडीकर विकास, कोरनुळे बसवेश्वर, बारोळे रामचंद्र, बारोळे वीरेश, सचिन पाटील, बालाजी देवकते सर, अशोक देवकते पाटील स्थानिक ग्रामस्थ, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
