आ. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते ६९ लक्ष रुपयांच्या विकासकामांचा लोकार्पण आणि भूमीपूजन सोहळा

आ. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते ६९ लक्ष रुपयांच्या विकासकामांचा लोकार्पण आणि भूमीपूजन सोहळा

अहमदपूर (गोविंद काळे) : आजनीवाडी येथे जलजीवन मिशन योजना अंतर्गत ४९ लक्ष रुपये पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ, मूलभूत सुविधा योजने अंतर्गत ५ लक्ष रुपये सिमेंट रस्ता कामाचे भूमीपूजन व १५ लक्ष रुपये सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लॉक रस्त्याच्या कामाचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ल आमदार बाबासाहेब पाटील यांनी उपस्थित राहून पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ केला. तसेच ग्रामस्थांशी संवाद साधला.प्रसंगी समवेत माजी जि.प गटनेते मंचकराव पाटील साहेब, माजी सभापती ॲड.टी एन कांबळे, महेश अर्बन बँकेचे उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे, किसान सेल ता.अध्यक्ष विनायकराव पाटील चोबळीकर, ह.भ.प बालाजी महाराज आजनीकर, माजी सरपंच सोमण येलगटे, सत्यवान इंद्राळे, माजी सरपंच गहिणीनाथ येलगटे, बाळुभाऊ येणगे, लहुजी येलगटे, अंकुश येलगटे, मा उपसरपंच शेषेराव कांबळे, ज्ञानेश्वर राचमाळे, गणेशराव चेबळे, चेबळे वेदांत, बालाजी गोमारे, ऋषी कांबळे, शाखा अभियंता साकोळे, सूत्रसंचालन माजी सरपंच आंबेगाव माधव माने आदी मान्यवर उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!