शिरूर ताजबंद येथे हरभरा खरेदी केंद्राचा शुभारंभ!
अहमदपूर (गोविंद काळे) : विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी शिरूर ताजबंद हरभरा खरेदी केंद्राचा शुभारंभ आज आमदार बाबासाहेब पाटील यांच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. शिरूर ताजबंद या ठिकाणी हरभरा खरेदी केंद्र व्हावे , यासाठी आपण वारंवार पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले आहे. शेतकरी बांधवांच्या हितासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे मत यावेळी आमदार यांनी व्यक्त केले. समवेत सेवानिवृत्त अभियंता सुभाषराव पाटील, साहेबरावजी जाधव, जिल्हा मार्केटिंग अधिकारी सोमारे, शिवानंद तात्या हेंगणे, दिलीपराव पाटील, निवृत्तीराव कांबळे, शिवाजीराव देशमुख, सरपंच मच्छिंद्र वाघमारे, रमाकांत भातिकरे, उपसरपंच युवा नेते सुरजभैय्या पाटील, चेअरमन तुळशीराम भोसले, ग्रामपंचायत सदस्य युवराजभैय्या पाटील, विनायकराव पाटील चोबळीकर, किशनराव कापसे, चेअरमन रामदास कदम, राजकुमार सोमवंशी, सुभाषराव गुंडेर, कोंडीबा पडोळे, हनुमंत बडगिरे, शुभम सारोळे, गोविंदराव सूर्यवंशी, धर्मपाल सरवदे, अमित दावणगावे, दिलीप गोविंदराव कापसे, मल्लिकार्जुन स्वामी, शंकर कचवे, भगवान तुपकर, लहू येलमटे, धनाजी कानवटे, विजयकुमार लोहारे, विलास सप्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
