मराठा सेवा संघातर्फे आ. बनसोडे यांचा सत्कार

मराठा सेवा संघातर्फे आ. बनसोडे यांचा सत्कार

उदगीर (एल. पी. उगीले) : उदगीर येथे छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृह तसेच उदगीर नळेगाव रोडवर भव्य असे छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराची उभारणी होत असल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, मराठा सेवा संघाच्या वतीने आ. संजय बनसोडे यांचा सत्कार करण्यात आला. यासोबतच आ. संजय बनसोडे यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा सुशोभीकरण करण्यासाठी देखील मुबलक निधी मंजूर केला आहे. त्याबद्दल मराठा सेवा संघाच्या वतीने ऋण व्यक्त करण्यात आले आहे. उदगीर येथे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्माण व्हावे, म्हणून सेवा संघाच्या वतीने सतत पाठपुरावा करण्यात येत होता. मराठा सेवा संघाची विचारधारा ही समता, बंधुता, एकता आणि एकात्मता निर्माण करणारी विचारधारा आहे. उदगीर मध्ये यापुढे हा समतेचा विचार रुजवत राहिला हवा. तसेच मराठा सेवा संघ एकसंघ रहावा यासाठीही प्रयत्न केले जात आहेत.

या सत्कार समारोहाच्या प्रसंगी मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. विवेक सुकणे, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष प्रदीप ढगे, माधवराव हलगरे, भरत पुंड, राजकुमार कानवटे, कालिदास बिरादार, ज्ञानेश्वर नकुरे, माधव विश्वनाथे, लहु डिगोळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!