शेतकऱ्यांनी शेतीपूरक उद्योगाकडे वळावे – तहसिलदार सुरेश घोळवे

शेतकऱ्यांनी शेतीपूरक उद्योगाकडे वळावे - तहसिलदार सुरेश घोळवे

देवणी (रणदिवे लक्ष्मण) : रसिका ऍग्रो प्रोसेसिंग फॉर्मर प्रोडुसर कंपनी लि, देवणी मार्फत देवणी येथे 60 टनी वजन काट्याचे उद्घाटन तहसीलदार सुरेश घोळवे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी अकेले,तालुका कृषी अधिकारी पाटील,आडत व्यापारी संघाचे अध्यक्ष विजयकुमार कोरे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन गोविंदराव भोपणीकर, कार्यकारी संचालक, रसिका ऍग्रो प्रोसेसिंग फॉर्मर प्रोडुसर कंपनी ली. देवणी यांनी केले. व रसिका ऍग्रो कंपनी द्वारे सुरू करण्यात आलेल्या विविध उद्योग व उपक्रमांची माहिती देण्यात आली. अध्यक्षीय भाषणात तहसीलदार सुरेश घोळवे यांनी शेतकऱ्यांनी शेतीपूरक उद्योग व जोडधंदे केले पाहिजेत, आणि आपल्या मुलांनाही त्याच पद्धतीचे शिक्षण दिले पाहिजे, शेतकऱ्यांनी शेतीपूरक उद्योग धंदे करून उद्योग व व्यापार क्षेत्रात पदार्पण करून शेती क्षेत्रात ही नवनवे प्रयोग केले पाहिजे, असे प्रतिपादन केले.

यावेळी गटविकास अधिकारी अकेले, तालुका कृषी अधिकारी पाटील, कृषी पर्यवेक्षक बी. एस. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास व्यापारी संघाचे अध्यक्ष माणिकराव लांडगे, प्राचार्य डॉ. चंद्रकांत जावळे, ईश्वर पाटील, मल्लिकार्जुन आप्पा डोंगरे, रतन पाटील, महादेव बिरादार, शिवानंद मिर्झापुरे, महादेव मिटकरी, प्रवीण बेळे, राहुल जाधव, विशाल पंढरपूर, योगेश ढगे, नंदू महाराज, दीपक पाटील, प्रदीप मोरे, विठ्ठल बिरादार, यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमास देवणी व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!