शिवाजी महाविद्यालयाची खेळाडू चे अखिल भारतीय अंतरविद्यापीठ सॉफ्ट बॉल स्पर्धेत सहभाग
उदगीर (एल.पी.उगीले) : पंजाब युनिव्हर्सिटी चंदीगड ( पंजाब ) येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय अंतर विद्यापीठ सॉफ्ट बॉल महिला स्पर्धेत येथिल शिवाजी महाविद्यालयाची खेळाडू कु. कांबळे निवेदिता वेदभूषण (बी. ए. तृतीय वर्ष )या विद्यार्थिनीने कौशल्याच्या आधारावर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या सॉफ्ट बॉल महिला संघाचे प्रतिनिधित्व केले.
खेळाडूच्या यशाबद्दल किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील, सचिव ज्ञानदेव झोडगे, कोषाध्यक्ष चामले नामदेव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विनायक जाधव, उपप्राचार्य प्रा.डॉ. एस. व्ही.जगताप, उपप्राचार्य प्रा. डॉ. आर. एम. मांजरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. विलास भोसले, पर्यवेक्षक प्रा. जी. जी. सूर्यवंशी, शिक्षक व कर्मचारी, व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.प्रा, नेहाल खान, प्रा. गजानन माने यांनी तंत्रशुद्ध पद्धतीने मार्गदर्शन केले.
