गणेश मुंडे यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार जाहीर

गणेश मुंडे यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार जाहीर

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर तालुक्यातील डोंगराळ व ग्रामीण भागातील गणेश मुंडे हे पत्रकारीतेच्या माध्यमातून सामाजिक सलोखा निर्माण करणारे काम करत आहेत.त्याच बरोबर समाजातील गोर गरीब जनतेचे ते काम तर करत असतात त्याच बरोबर समाजातील नागरीकांना जे जमल त्या पध्दतीने मदत करत आहेत. या कार्याची दखल घेत बहुभाषिक भाऊ बाबा वंजारी संघामार्फत दिला जाणारा राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार नुकताच जाहीर झाला असल्याची माहिती बहुभाषिक भाऊ बाबा वंजारी समाज संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा लक्ष्मीताई गरकळ यांनी दिली आहे.बहुभाषिक भाऊ – बाबा वंजारी समाज संघना ही पुरस्कारा बरोबर समाजातील अन्य समस्यावर आवाज उठवण्याचे कार्य करत असते.या संघटनेचे सामाजिक जाळे संपुर्ण महाराष्ट्रात पसरत आहे.महीलाच्या विविध समस्यांवर लक्ष्मीताई गरकळ या आवाज उठवतात. समाजातील काम करणाऱ्याना पुरस्कार देऊन प्रोत्साहन देत असतात.त्यामुळे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वंजारी संघाच्या मेळाव्यामध्ये गणेश मुंडे यांना सन २०२३ चा समजभूषण पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते वितरित होणार आहे.

About The Author

error: Content is protected !!