प्लास्टिक मुक्त उदगीरसाठी इनरव्हिल क्लबचा स्तुत्य उपक्रम
उदगीर(एल.पी.उगीले) : पर्यावरणसाठी अत्यंत घातक असणारे प्लास्टिक वापरल्यामुळे पर्यावरणालाच नाही तर आपल्या प्राणीमात्रावर वाईट परिणाम होत आहे.भविष्यातील यामुळे होणारा धोका ओळखून उदगीर येथील इनरव्हिल क्लब द्वारा छत्रपती शिवाजी महाराज चौक, आप्पाराव चौक येथील भाजी व फळ विक्रेतांना व ग्राहकांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. त्याच बरोबर “प्लास्टिक पिशव्या टाळा व कापडी पिशव्यांचा आग्रह धरा”यासाठी जनजागृती करण्यात आली.या उपक्रमासाठी प्रोजेक्ट प्रमुख होत्या सौ. पुजा गर्जे याच बरोबर इनरव्हिल क्लब उदगीरच्या अध्यक्षा सौ. मीरा चंबुले, उपाध्यक्षा सौ. स्वाती गुरूडे, कोषाध्यक्ष सौ. मानसी चन्नावार, क्लब सीसी सौ. अश्विनी देशमुख आणि सदस्य सौ. प्रिया नारखेडे,सौ. नेहा जैन,सौ. आशा देवणे डॉ. सौ. तृप्ती दाचावार यांची उपस्थिती होती.इनरव्हिलच्या या उपक्रमात राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक विश्वनाथ मुडपेजी तसेच देवीदास नादरगे यांनी उपस्थिती लावून पाठिंबा दर्शविला.
