ओंकारेश्वर महादेव मंदिरात परमरहस्य ग्रंथ पारायण व प्रवचन कार्यक्रम 29 मार्च पासुन प्रारंभ

ओंकारेश्वर महादेव मंदिरात परमरहस्य ग्रंथ पारायण व प्रवचन कार्यक्रम 29 मार्च पासुन प्रारंभ

उदगीर (एल.पी.उगीले) : औंकारेश्वर महादेव मंदिर येथे परमरहस्य ग्रंथाचे पारायण व प्रवचन कार्यक्रमास बुधवार २९ मार्च २०२३ रोजी पासुन प्रारंभ होत आहे. उदगीर शहरालगत असलेल्या मलकापुर नविन वसाहत पोस्ते नगर एस.टी.काॅलणी येथील औंकारेश्वर महादेव मंदिरात बुधवार दि.२९ मार्च रोजी प्रारंभ होत असुन दररोज पहाटे ६ वा. रुद्राभिषेक १० वा परमरहस्य ग्रंथाचे पारायण ,१२वा.आरती ,४ वा. प्रवचन ,५ वा.शिव भजन,शिवपाठ ,टिपरी व.आरती असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यात बुधवार दि.२९मार्च रोजी शि.भ.प.सौ. अनिताई शिवानंद हैबतपुरे, गुरुवार दि.३० मार्च रोजी प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरिय विश्व विद्यालय उदगीर केंद्राच्या संचालिका ब्र.कु. महानंदा बहनजी यांचे प्रवचन,शुक्रवार दि.३१मार्च रोजी शि.भ.प.सौ.शिलाताई मालोदे ,शनिवार दि.१एप्रिल रोजी शि.भ.प. सौ.चंद्रकला रमेश आठाणे,रविवार दि.२ एप्रिल रोजी कु.ज्योती टाकळे, सोमवार दि.३ एप्रिल रोजी शि.भ.प.अश्विनिताई स्वामी यांचे प्रवचन होणार आहे. मंगळवार दि.४एप्रिल रोजी परमरहस्य ग्रंथाचे पारायणाची सांगता श्री गुरु हावगीस्वामी महाराज मठ संस्थांनचे मठाधिश ष.ब्र. १०८ डाॅ.शंभूलिंग शिवाचार्य महाराजांचे आशिर्वचन व महारती होऊन महाप्रसादाने सांगता होणार आहे.उत्सव काळात बसवनकेरी महिला भजनी मंडळ,शिवशक्ती महिला भजनी मंडळ मलकापूर,तपसिध्देश्वर महिला भजनी मंडळ आठाने नगर,सिध्दरामेश्वर महिला भजनी मंडळ,नवशा महादेव हावगी स्वामी महिला भजनी मंडळ,सोमेश्वर महिला भजनी मंडळ ,आजोबा गणपती महिला भजनी मंडळ आदी सहभागी होणार आहेत.परमरहस्य ग्रंथाचे पारायण उत्सव यशस्वी करण्यासाठी औंकारेश्वर महादेव महिला भजनी मंडळ परिश्रम घेत आहे.

About The Author

error: Content is protected !!