आयपीएस कृष्ण प्रकाश यांचा आणखी एक नवा विक्रम

आयपीएस कृष्ण प्रकाश यांचा आणखी एक नवा विक्रम

पुणे (प्रतिनिधी) : पुणे येथील माजी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आपल्या कर्तबगार यांनी कर्तव्य कठोर भूमिकेने आपले वेगळेपण जपले आहे. गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून ते ओळखले जातात. पोलीस प्रशासनात कार्यरत असताना देखील वेगवेगळी आव्हाने पेलने त्यांना आवडते. आयर्न मॅन पुरस्कार प्राप्त करणारे पोलीस प्रशासनातील ते पहिले अधिकारी आहेत. या अधिकाऱ्याने आणखी एक जागतिक विक्रम निर्माण केला आहे. त्यांनी गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा गुहापर्यंत पोहत जाण्याचे अवघड काम पूर्ण केले आहे, आणि अशा पद्धतीने प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहणारा पहिला व्यक्ती म्हणून त्यांच्या नावाची नोंद करण्यात आली आहे.

एलिफंटा लेणी ते गेटवे ऑफ इंडिया या लोकप्रिय जलतरण मार्गाच्या विरुद्ध जलतरणपटू उंच भरतीच्या लाटावर गेटवेच्या दिशेने प्रवास करतात. या पोहण्याच्या कामात लाटा खूप मदत करतात, मात्र कृष्णप्रकाश यांनी मोठे धाडस करत लाटांच्या विरुद्ध उलट बाजूने प्रवास करण्याचा निर्णय घेतला, आणि दृढ निश्चय असलेल्या या अधिकाऱ्याने तो यशस्वी करून दाखवला. 16.20 किलोमीटर इतक्या अंतर पोहत जाण्यात साठी त्यांना पाच तास 26 मिनिटे इतका वेळ लागला. ही आपली मोहीम आणि कर्तबदारी आपण दक्षता पथकातील “बुडणे प्रतिबंधक जागरूकता अभियान” राबवणाऱ्या कर्तबगार कर्मचाऱ्यांना समर्पित करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच माझे हे पोहणे तरुण भारतीयांना दहा किलोमीटर ओपन वॉटर स्विमिंग ऑलिंपिक पदक जिंकण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करण्यास प्रेरित करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

आयपीएस कृष्ण प्रकाश पुणे येथे पोलीस आयुक्त असताना त्यांनी गाजवलेल्या विशेष कामगिरीबद्दल, “पोलीस फ्लॅश न्यूज” ने त्यांच्या कर्तबगारीची दखल घेत”आयर्न मॅन कृष्णप्रकाश” हे पुस्तक प्रकाशित केले होते. अशा या नवीन नवीन रेकॉर्ड निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्याच्या या नवीन कामगिरीबद्दलही पोलीस फ्लॅश न्यूजच्या वतीने हार्दिक शुभेच्छा.

About The Author

error: Content is protected !!