देवणी येथे ३ एप्रिल रोजी शिवपार्वती विवाह सोहळा लंम्पी आजारामुळे यंदाचा पशुप्रशंप्रदर्शनाचा कार्यक्रम पुढे घेण्यात येणार आहे

देवणी येथे ३ एप्रिल रोजी शिवपार्वती विवाह सोहळा लंम्पी आजारामुळे यंदाचा पशुप्रशंप्रदर्शनाचा कार्यक्रम पुढे घेण्यात येणार आहे

देवणी (रणदिवे लक्ष्मण) : येथील श्री ग्रामदैवत महादेव मंदिर यात्रा महोत्सव २०२३ निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमासह जंगी कुस्त्याांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. लंम्पी चर्म आजाराच्या वाढत्या रुग्णांचे प्रमाणामुळे यंदाचा पशुप्रदर्शनाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. श्री महादेव यात्रा निमित्त बुधवार दि. २२ मार्च पासून सोमवार दि. ३ एप्रिल २०२३ पर्यंत दररोज सकाळी ९ ते १२ महादेवाला संगीत महारुद्र अभिषेक व रात्री ९ ते १२ बैठकी भजन व कीर्तन. शनिवार दिनांक १ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ठीक ७ वाजता युवा व्याख्याते गणेशजी शिंदे, अहमदनगर यांचे जीवन सुंदर आहे या विषयावर व्याख्यान रविवार दि. २ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता धनराज महाराज बुलबुले सामनगावकर यांचे कीर्तन होणार आहे. सोमवार दि. ३ एप्रिल रोजी दुपारी १:०५ मिनिटांनी शिवपार्वती – (कावडीचे लग्न) विवाह सोहळा संपन्न होणार आहे. सध्या परिस्थितीमध्ये लंम्पी चर्म रोगाचे देवणी व उदगीर तालुक्यामध्ये जनावरांमध्ये प्रमाण वाढत असल्याने यंदाचे पशु पशुप्रदर्शन कार्यक्रम रद्द करण्यात आलेला आहे. हे आजार कमी झाल्यानंतर पशु प्रदर्शनाची तारीख कळवण्यात येईल, असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजकुमार पडीले यांनी कळवले आहेत.मंगळवार दिनांक ४ एप्रिल २०२३ रोजी दुपारी १ वाजता जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेनिमित्त सर्व कार्यक्रम महादेव मंदिर परिसरात देवनदी काठी होणार आहेत . तरी सर्व भक्तांनी या सर्व कार्यक्रमाचे लाभ घ्यावा, असे आवाहन विश्वस्त समिती व श्री ग्रामदैवत महादेव मंदिर यात्रा समिती व समस्त गावकऱ्यांकडून करण्यात आले आहे.

About The Author

error: Content is protected !!