आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष ना. नरेंद्रजी पाटील यांची आ. रमेशआप्पा कराड यांच्या भाजपा संवाद कार्यालयास सदिच्छा भेट

आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष ना. नरेंद्रजी पाटील यांची आ. रमेशआप्पा कराड यांच्या भाजपा संवाद कार्यालयास सदिच्छा भेट

लातूर (एल.पी.उगीले) : राज्यातील आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ना. नरेंद्रजी आण्णासाहेब पाटील यांनी मंगळवारी भाजपाच्या संवाद कार्यालयास सदिच्छा भेट दिली. त्यांचा लातूर जिल्हा भाजपाचे वतीने जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती भेट देऊन यथोचित सत्कार करून स्वागत केले.यावेळी भाजपाचे प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संजय दोरवे, विक्रमकाका शिंदे, आर्थिक विकास महामंडळाच्या माजी सदस्या अँड वैशाली लोंढे यांची प्रमुख उपस्थिती होती.

आजपर्यंत मराठा समाजाचा वापर केवळ निवडणुकीपुरताच झाला, मात्र या समाजाला न्याय देण्याचे काम उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केले असून आरक्षणाबरोबरच महामंडळ पुनर्जीवित केले असे सांगून यावेळी बोलताना नरेंद्र अण्णासाहेब पाटील म्हणाले की, मराठा समाजा बरोबरच लिंगायत, धनगर, वडार, रामोशी या समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी महामंडळाची स्थापना केली. विविध महामंडळाच्या माध्यमातून भाजपाचा कार्यकर्ता सक्षम झाला पाहिजे, आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवली पाहिजे, असे त्यांनी बोलून दाखवले.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी महाराष्ट्राचा दौरा करून मराठा समाज बांधवांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्याचबरोबर प्रत्येक समाजाला आर्थिक स्थैर्य देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी विविध महामंडळाची स्थापना केली, असे सांगितले. यावेळी बोलताना आ. रमेशआप्पा कराड यांनी लातूर जिल्ह्यातील मराठा समाजातील बेरोजगार तरुणांचा मिळावा घेण्यासाठी आपण आम्हाला वेळ द्यावा, अशी विनंती नरेंद्र पाटील यांना केली. तर मराठा समाजातील शेवटच्या घटकाला न्याय देण्याची जबाबदारी देवेंद्रजी फडणीस यांनी नरेंद्र पाटील यांच्यावर दिली असल्याचे सांगून अरविंद पाटील निलंगेकर यांनी त्यांच्या कार्याचे माहिती दिली.

यावेळी प्रदेश भाजपाचे अमोल पाटील, लातूर ग्रामीण विधानसभेचे अध्यक्ष अनिल भिसे, संगायोचे अध्यक्ष वसंत करमुडे, लातूर तालुका भाजपा अध्यक्ष बन्सी भिसे, माजी उपसभापती अनंत चव्हाण, माजी नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे, जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र गोडभरले, सुरज शिंदे, शरद दरेकर, चंद्रसेन लोंढे नाना, ज्ञानोबा भिसे, सुधाकर गवळी, अशोक सावंत, गोपाळ पाटील, प्रताप पाटील, ज्ञानेश्वर जुगल, भैरवनाथ पिसाळ, बाबासाहेब भिसे, श्रीकृष्ण पवार, महादेव जाधव यांच्यासह अनेकजण होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणापूर तालुका भाजपा अध्यक्ष अँड दशरथ सरवदे यांनी केले.

About The Author

error: Content is protected !!