महालक्ष्मी मंदिरात दुर्गा सप्तशती पाठाचे पारायण संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : अखिल भारतीय श्री.स्वामी समर्थ गुरुपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर द्वारा संचलित उदगीर शहरातील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा बालसंस्कार केंद्र मादलापूर व मलकापूर या केंद्रातील कार्यरत सेवेकरी, सेवेकरी भाविक – भक्त यांच्या उपस्थितीत चैत्र नवरात्र च्या निमित्ताने व उदगीर शहरात लवकरात लवकर श्री.स्वामी समर्थ महाराजांचे कला मंदिराच्या बाजूस गावात परिवाराने दिलेल्या जागेवर लवकरात लवकर (दरबार) मंदिर व्हावे, यासाठी परब्रम्ह स्वरूप गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने व गुरुपुत्र दादासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काल दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पारायण अनेक भावी – भक्त, सेवेकरांच्या उपस्थितीत कला मंदिराच्या समोरील महालक्ष्मी मंदिरा संपन्न झाले. यावेळी लातूर येथील कार्यरत सेवेकरी अक्षय जाधव यांनी गुरुपीठांतर्गत चालणारे 18 विभागाबद्दल व जनकल्याण योजनेबद्दल माहिती सांगितली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुकाप्रमुख सचिन बामनपल्ले, विशाखा गादा,वनमाला नीला, चंदा हादवे,राजश्री मुळे,अनिता स्वामी,बंडू काळे,निवृत्ती जवळे, ममता बिरादार, विजयमाला पडोळे यांनी परिश्रम घेतले.
