विवेक जाधव यांचा सत्कार संपन्न

विवेक जाधव यांचा सत्कार संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था गंगापूर यथील वसुली १००% झाल्याबद्दल लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा देवर्जन येथे गंगापूर-भाकसखेडा सोसायटीचे चेअरमन विवेक पंडितराव जाधव यांचा सत्कार लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका श्रीमती लक्ष्मीताई भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विवेक जाधव यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना जिल्हा बँकेच्या स्वरुपात सहकारमहर्षी दिलीपरावजी देशमुख यांनी दिलेलं वरदान असून आ. धीरजभैय्या देशमुख यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी जिल्हा बँक यशस्वी वाटचाल करत असल्याचे सांगितले. बँकेच्या संचालिका श्रीमती लक्ष्मीताई भोसले यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी विचारुन त्यांना समाधानकारक उत्तरे दिली. तसेच उदगीर तालुक्याचे फिल्ड ऑफिसर यांनी देवर्जन शाखेचा अहवाल सर्वांसमोर सादर केला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वि.का. सोसायटी तोंडचीर च्या संचालिका प्रितीताई चंद्रशेखर भोसले, देवर्जनचे सरपंच अभिजीत साकोळकर, नेत्रगाव चे चेअरमन जीवन पाटिल, अरसनाळ चे चेअरमन महेश मोरे, देवर्जन चे व्हाईस चेअरमन वाडीकर, गंगापूरचे व्हाईस चेअरमन हंसराज माळेवाडे, संचालक विजयकुमार बुर्ले, नरेंद्र पाटिल, संदिप मोरे, सुजित कोरे, अविनाश गायकवाड, सोजरबाई जाधव तसेच प्रशांत जाधव, ज्ञानेश्वर जाधव, शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन गटसचिव संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ बिरादार, गंगापूर संस्थेचे सचिव दत्ता सूर्यवंशी, शाखा तपासणीस अण्णासाहेब मुळे, प्रभारी व्यवस्थापक बाबा शिंदे, लिपिक सुरेश खटके यांनी केले होते. यावेळी फिल्ड ऑफिसर हणमंत पवार यांनी सूत्रसंचलन केले, राम बिरादार यांनी सर्व शेतकरी,संस्था व ग्रामस्थांच्या वतीने संचालिका श्रीमती लक्ष्मीताई भोसले यांचे आभार मानले.

About The Author

error: Content is protected !!