लेखापाल क्षेत्रात करिअर उत्तमपणे करता येते – ओमकार ढगे

लेखापाल क्षेत्रात करिअर उत्तमपणे करता येते - ओमकार ढगे

उदगीर (एल.पी.उगीले) : भारतात मल्टिनॅशनल बहुराष्ट्रीय कंपन्या मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्याबरोबरच दिवसेंदिवस प्रत्येकाचं इकॉनॉमिक ग्रोथ वाढत आहे. विविध संस्था, सोसायटी, कंपन्या, व्यवसाय, उद्योग व शिक्षण इत्यादी विविध क्षेत्राचे ऑडिट करण्यासाठी लेखापालची गरज असते. एकंदरीत भविष्यकाळ सनदी लेखापालसाठी उज्ज्वल आहे.म्हणून या काळात विद्यार्थ्यांना चांगल्या प्रमाणे करिअर करता येते, असे विचार सनदी लेखापाल ओमप्रकाश ढगे यांनी व्यक्त केले.

येथील श्री हावगीस्वामी महाविद्यालयात व्यवसाय मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षा समिती च्या वतीने ध्यास यशाचा या उपक्रमांतर्गत आभासी पद्धतीने आयोजित व्याख्यान मालेचे तिसरे पुष्प सनदी लेखापाल या परीक्षेत नुकतेच यशस्वी झालेले ओमकार श्रीनिवास ढगे यांनी गुंफले. यावेळी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.एन.जी.एमेकर व उपप्राचार्य डॉ.अप्पाराव काळगापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीला प्रमुख मार्गदर्शकांचा परिचय डॉ.मनोहर भंडारे यांनी करून दिला.पुढे बोलताना ओमकार ढगे म्हणाले, या क्षेत्रात केवळ हुशार असून चालत नाही, तर खूप मेहनत घ्यावी लागते. आपण किती वेळ देतो, हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. ज्ञानाबरोबरच, बोलण्याचे कौशल्य व संगणकाचे ज्ञान असेल, तर या क्षेत्रात चांगल्या प्रकारे जीवन जगता येते.

यावेळी त्यांनी संधी लेखापालासाठी आवश्यक असलेले फाउंडेशन, इंटरमीडिएट व फायनल परीक्षा याचे अभ्यासक्रम, साधनसामग्री व तयारी कशी करावी यासंदर्भात विस्ताराने मार्गदर्शन केले.शुभेच्छापर मनोगतात महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.एन.जी. एमेकर म्हणाले,अगदी कमी काळात व कमी खर्चात सनदी लेखापाल होऊन विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे रोजगार मिळविता येते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी करिअर म्हणून हे क्षेत्र निवडावे.

आभासी व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी समितीतील डॉ.म.ई.तंगावार, प्रा.जे.डी. संपाळे, प्रा. मनोहर व भालके व प्रा.एस.एस. स्वामी यांनी प्रयत्न केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समितीचे प्रमुख डॉ.एल. के.उलगडे तर आभार डॉ.दत्ताहरी होनराव यांनी मानले.

About The Author

error: Content is protected !!