ग्राहकांनीदेखील आपले हक्क जाणून घेणे गरजेचे आहे – तहसीलदार रामेश्वर गोरे
उदगीर (एल.पी.उगीले) : ग्राहककेंद्रीत बाजारव्यवस्था निर्माण होणे ही काळाची गरज असताना, अशा सुविधांचा लाभ घेऊन ग्राहकांनी देखील आपले हक्क जाणून घेणे गरजेचे आहे. हक्कांचा उपयोग करुन ग्राहक हित जोपासणारी व्यवस्था निर्माण होण्याच्या दृष्टीने सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने ग्राहक हा ‘राजा’ होऊ शकेल. असे मत तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी व्यक्त केले.
जागतिक ग्राहक हक्क पंधरवडा दिनाचे औचित्य साधून बुधवार दि.२९ मार्च रोजी तहसिल कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.
कार्यक्रमाचे उद्दघाटन ग्राहक संरक्षण परिषेदेचे अशासकीय सदस्य तथा ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे जिल्हासंघटक बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पणन महासंघाचे संचालक तथा तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन भरतभाऊ चामले, प्रांत ग्राहक समितीचे मराठवाडा अध्यक्ष अभिजीत औटे-पाटील, ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे उदगीर तालुकाअध्यक्ष प्राचार्य व्ही.एस.कणसे, तालुका संघटक प्रा.अविनाश पाटील, प्रांत ग्राहक समितीच्या लातूर जिल्हाउपाध्यक्षा सौ.संगिता दिपक नेत्रगावे-पाटील, कार्यकर्ती सौ.चंचला हुगे, नायब तहसीलदार धाराशिवकर कुलकर्णी, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार संतोष गुट्टे, पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार एस.पी.बेंबळगे, पुरवठा सहाय्यक सौ.विद्या पवार, रास्त धान्य दुकानदार संघटनेचे नुतन अध्यक्ष रणजीत पाटील, सचिव, उपाध्यक्ष उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरूवात ग्राहकतीर्थ स्व.बिंदुमाधव जोशी व ग्राहक चळवळीचे अधिष्ठान स्वामी विवेकानंदाच्या तैलचित्रास पुष्पहार व दिपप्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नायब तहसीलदार संतोष गुट्टे यांनी केले. यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे जिल्हासंघटक बालासाहेब गोविंदराव शिंदे यांनी ग्राहकहित, ग्राहक म्हणून मिळालेले ६ हक्क, ग्रहक कायदा, होणारी फसवणूक, तसेच जागतिकीकरणानंतर जग हे ग्लोबल खेड्यात रूपांतरित होत आहे. ग्लोबल खेड्यांची बाजारपेठ देखील झपाट्याने विकसित होत आहे. विकसित होणाऱ्या बाजारात बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आगमनामुळे जगातील सर्वच देशात नामांकित ब्रँड्स सहजपणे उपलब्ध होत आहेत. त्यातच ऑनलाईन शॉपिंगचा पर्याय ग्राहकाकडे आल्याने नामांकित ब्रँड्स एका क्लिकसरशी ग्राहकांना घरपोच मिळू लागला आहेत. बाजारातल्या या वाढत्या स्पर्धेमुळे आज ग्राहक हा खऱ्या अर्थाने ग्राहक राजा बनला आहे. अशा परिस्थितीत ग्राहक राजाची फसवणूक होऊ नये, याकरिता ग्राहक हक्क संरक्षण व्यवस्था मजबूत व्हायला हवी. असे मत, ग्राहक संरक्षण परिषेदेचे शासकीय सदस्य बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर यांनी व्यक्त केले मानले.
