श्री बालाजी मंदिरात 30 मार्च गुरुवार पासुन अखंड हरीनाम सप्ताह सुरु
वाढवणा बु.(हुकूमत शेख) : वाढवणा बु. सर्व भाविक भक्तांना कळविण्यात आनंद होतो की, वाढवणा येथील श्री भगवान बालाजी मंदिरामध्ये दि.30 मार्च गुरुवार पासुन अखंड हरीनाम सप्ताह सुरु झाला असुन 30 मार्च ते 7 एप्रिल शुक्रवार पर्यंत सप्ताह चालणार आहे. सप्ताह संभारभानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तरी आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून श्रवणचा लाभ घेण्याचे आवाहन बालाजी मंदिर संस्थान कडुन करण्यात आले आहे. दैनंदिन कार्यक्रमाची रूपरेषा पहाटे 4 ते 6 काकडा आरती सकाळी 6 ते 8-30 श्री महापूजा, अभिषेक व आरती सकाळी 9 ते 12 ज्ञानेश्वरी परायण दुपारी 12 ते 1 गाथा भजन सायंकाळी 6 ते 7 हरिपाठ रात्री 9 ते 11हरिकीर्तन,7 एप्रिल शुक्रवार रोजी 10 ते 12 काल्याचे किर्तन व सप्ताह ची सांगता काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. कीर्तनकार ह.भ. प. पंढरी महाराज मिरकुटे यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता होईल. लगेच श्री बालाजी मंदिर संस्थान कडून उपस्थित भाविक भक्तांना महाप्रसादाचा कार्यक्रम तरी भाविक भक्तानी या सप्ताहाचा लाभ घेण्याची विनंती अध्यक्ष व समस्त आर्य वैश्य समाज व समस्त गावकरी मंडळी कडुन करण्यात आला आहे.
