बनशेळकी येथे आंगणवाडीचा वतीने पोषण पखवाडा कार्यक्रम संपन्न

बनशेळकी येथे आंगणवाडीचा वतीने पोषण पखवाडा कार्यक्रम संपन्न

उदगीर ( एल.पी.उगीले) : उदगीर तालुक्यातील बनशेळकी या ठिकाणी अंगणवाडीच्या वतीने पोषण पंखवाडा कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच विकास शेळके हे होते. प्रमूख पाहुणे म्हणुन उपसरपंच विवेक महाजन, पत्रकार मनोहर लोहारे ई. उपस्थित होते.

या वेळी सरपंच व उपसरपंच विवेक महाजन यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी सरपंच विकास शेळके व पत्रकार मनोहर लोहारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंगणवाडी कार्यकर्ती आशा कवठाळे यांनी लहान बालकाना कशा प्रकारचे आहार देऊन लहान बालकांची कशी काळजी घ्यायची? हे सांगितले.या कार्यक्रमाचे आभार अंगणवाडी कार्यकर्ती संगीताताई शेटकार यांनी मांडले.

या कार्यक्रमाला अंगणवाडी कार्यकर्ती नंदाताई काळे, मदतनीस आशा आवळे ,यांच्यासह पुजा लोहारे, उमादेवी आवाळे, स़गीता काळे ,शिल्पा आंबेगावे यांच्यासह गावातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!