भुरट्या चोरट्यांनी हस्तांदोलनचा बहाना करत, हातातील अंगठ्या पळवल्या!

भुरट्या चोरट्यांनी हस्तांदोलनचा बहाना करत, हातातील अंगठ्या पळवल्या!

उदगीर (एल.पी. उगिले) : उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या समोर उदगीर- नांदेड रोडवर सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास, गणपत गुरुनाथ बोळेगावे वय 80 वर्ष हे सेवानिवृत्त सद् गृहस्थ सकाळीच केस कर्तनालया कडे केस कापण्यासाठी जात असताना, अचानक समोरून दोघेजण आले. आणि ओळख असल्याचे दाखवत, अज्ञात आरोपितानी एकटा गृहस्थ जात असल्याचे पाहून फिर्यादीस हस्तांदोलनाचा बहाना करत, हात पुढे करून फिर्यादीचा हात हातात घेतला. आणि त्यांच्या हातातील दोन सोन्याच्या अंगठ्या, त्यापैकी एक दीड तोळ्याची, तर दुसरी एक तोळ्याची असे एकूण अंदाजे किंमत 85 हजार रुपये काढून घेतल्या. फिर्यादी यांनी आरोपीच्या हाताला धरून अंगठ्या वापस दे. असे म्हणून आरोपी सोबत हुज्जत घालत असताना, त्या आरोपीनी सोन्याची अंगठी म्हणून त्याच्या जवळील रुमालात दोन खडे गुंडाळून रुमाल फिर्यादीस, तुमच्या सोन्याच्या अंगठ्या परत देत आहे. असे म्हणून फिर्यादीच्या खिशात घालून फिर्यादीची फसवणूक केली. व दोन्ही अनोळखी आरोपी मोटरसायकल वर बसून निघून गेले. फिर्यादीने मोटरसायकलचा नंबर पाहिला नसल्याने ते लगेच फरार झाले. फिर्यादीच्या तक्रारीवरून उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 197/ 23 कलम कलम 420, 417, 34 भारतीय दंड विधानसहिता अन्वये नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भोळ हे करत आहेत. उदगीर ग्रामीण पोलिसांच्या कर्तबगारीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक भोळ यांच्या तपासाच्या संदर्भात वरिष्ठाकडे अनेक तक्रारी गेलेले असल्याने, या प्रकरणाचा तरी तपास निपक्षपातीपणे व लवकरात लवकर होईल का? अशी चर्चा महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय परिसरात चालू आहे.

About The Author

error: Content is protected !!