भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
अहमदपूर (गोविंद काळे) : बालाघाट तंत्रनिकेतन तथा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने संस्थेचे संचालक कुलदीप भैय्या हाके यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली.
स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ, समाजसुधारक, पत्रकार, वकील, दलित बौद्ध चळवळीचे प्रेरणास्थान आणि भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. १४ एप्रिल १८९१ रोजी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. प्रचंड बुद्धिमत्ता, समाजासाठी असीम त्याग करणारे, दलित समाजाला हक्क मिळवून देणारे, महाडचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे दहन, मंदिर सत्याग्रह, शेतकऱ्यांचा कैवारी, गोलमेज परिषद, पुणे करार, स्वतंत्र मजूर पक्ष, बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना, दलित शिक्षण संस्थेची स्थापना, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना, महिलांसाठी कार्य, स्वातंत्र्य लढ्यात सहभाग अशा कितीतरी गोष्टी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनात केल्या. समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. समाजामधील तळागाळातील व्यक्तींचा प्रामुख्याने विचार केला. शिक्षणासाठी, समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष केला. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा गुरुमंत्र दिला. असे मत श्री कुलदिप हाके यांनी मांडले
यावेळी संचालिका शिवालीकाताई हाके, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नितीन पी. शिवपुजे, उपप्राचार्य प्रा.स्वप्नील नागरगोजे, प्रा संग्राम कोपनर, प्रा.सुहास दहीटनकर, प्रा.कालिदास पिटाळे,श्री सिद्राम मासोळे, श्री नरवटे, श्री कैलास होनमाणे, श्री सतीश केंद्रे आदी उपस्थित होते.