दैनदिन जिवनात निष्ठेने काम करणे हाच सदाचार – सौ.अनिता हैबतपूरे

दैनदिन जिवनात निष्ठेने काम करणे हाच सदाचार - सौ.अनिता हैबतपूरे

उदगीर(एल.पी.उगीले) दैनदिन जिवनात आपले काम निष्ठेने पार पाडणे, हाच सदाचार आहे. असे विचार शि.भ.प.सौ.अनिता शिवानंद हैबतपूरे यांनी व्यक्त केले.
उदगीर शहरालगत असलेल्या मलकापुर निविन वसाहत पोस्ते नगर एस.टी.काॅलणी येथील औंकारेश्वर महादेव मंदिरात परमरहस्य ग्रंथ पारायण,प्रवचन सोहळ्यास प्रारंभ झाला.प्रवचनाचे पहिले पुष्प शि.भ.प.सौ.अनिताई शिवानंद हैबतपुरे यांनी गुंफले.प्रवचनात म्हणाल्या की,विवेकाने सदाचार पारखुन तो नित्य करत राहावा. कुठल्याही कर्मात विवेक असावाच लागतो, पण तो विवेक स्वार्थी नसावा .सत्कर्माची व्यापकता लोककल्याणात आहे .चैतन्याशी संवाद साधता येणारा शंब्द म्हणजे खर्‍या अर्थाने सांस्कृतीक श्रीमंती आहे,शब्दच माणसाला घडवतात आणि बिघडवतातही, शब्दच माणसाच्या आयुष्याला उभारी देतात. पंखात बळ निर्माण करतात, प्रेरणादायी शब्द अक्षरक्ष: माणसाला उंच उभारी घ्यायला लावतात, असे विचार व्यक्त केले.प्रारंभी स्वागत सौ.वनमाला अशोक कप्ते यांनी केले.कार्यक्रमाचे संचलन श्रीमती सुनिता कड्डे यांनी तर आभार सौ.शितल योगेश कप्ते यांनी मानले.परमरहस्य ग्रंथाचे पारायण उत्सव यशस्वी करण्यासाठी औंकारेश्वर महादेव महिला भजनी मंडळ परिश्रम घेत आहे.

About The Author

error: Content is protected !!