मर्यादायुक्त वर्तन हिच संस्कृती आहे – ब्र.कु.महानंदा बहन

मर्यादायुक्त वर्तन हिच संस्कृती आहे - ब्र.कु.महानंदा बहन

उदगीर (एल.पी.उगीले) मर्यादायुक्त वर्तन हिच संस्कृती आहे. मुलांवर चागले संस्कार करा, तेच जिवनभर उपयोगी पडेल, यातूनच सुसंस्कृत भारत घडेल, असे विचार ब्र.कु.महानंदा बहन यांनी व्यक्त केले.
उदगीर शहरालगत असलेल्या मलकापुर निविन वसाहत पोस्ते नगर एस.टी.काॅलणी येथील औंकारेश्वर महादेव मंदिरात परमरहस्य ग्रंथ पारायण ,प्रवचन सोहळ्यास प्रारंभ झाला.प्रवचनाचे दुसरे पुष्प
गुंफयांना प्रवचनात उदगीर शहरालगत असलेल्या मलकापुर नविन वसाहत पोस्ते नगर एस.टी.काॅलणी येथील औंकारेश्वर महादेव मंदिरात आयोजित परमरहस्य ग्रंथ पारायण ,प्रवचन सोहळ्यात प्रवचनाचे दुसरे पुष्प प्रजापपिता ब्रम्हाकूमारी विश्वविद्यालय उदगीर केंद्राच्या संचालिका ब्र.कु.महानंदा बहन यांनी गुंफले.
प्रवचनात बहनजी म्हणाल्या की, परिवर्तन हे विश्व परिवर्तनाचा पाया असुन काळाबरोबर स्वत:ला बदलायला शिका, त्याची सुरुवात स्वत:पासुन करा.चांगल्या गोष्टीची सुरुवात करण्यासाठी मुहर्त पाहतो, परंतू वाईट काम करण्यासाठी मुहर्त पाहत नाही, जे आहे त्यात आनंद माना,नाही त्याचे दु:ख मानत बसु नका. चांगले कर्म करा, चांगले फळ मिळेल. सत्कर्मासाठी आपला वेळ खर्च करा.आपल्याशी संबंधीत नसलेल्या कामात आपण ज्यास्त वेळ घालवतो ,काय बोलावे ,काय खावे, काय बोलू नये,काय करावे काय करु नये याचे चिंतन करण्याची गरज आहे.
आध्यात्माला धर्म पंथाच्या मर्यादा नाहीत, फक्त त्यांच्या पध्दती वेगवेगळ्या असतील. आध्यात्माचा प्रभाव जीवनाच्या परिवर्तनावर होतो. एकमेकाना समजून घ्या, त्या साठी आध्यात्माची गरज आहे. त्यामुळे जीवन बदलेल. असे बहुमोल विचार ब्र.कु.महानंदाबहन यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे संचलन सौ.शितल योगेश कप्ते यांनी तर आभार अशोक कप्ते यांनी मानले.

About The Author

error: Content is protected !!