प्रभू श्रीरामांची जीवन कथा भारतीय साहित्याच्या उत्कर्षाला प्रेरणा देते – केंद्रे
उदगीर (एल.पी.उगीले) : हाळी हंडरगुळी येथे आयोजित श्रीराम नवमी जन्मोत्सवानिमित्त पोवाड्याच्या कार्यक्रमा निमित्त जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे म्हणाले कि,प्रभू श्रीराम एक आदर्श पुत्र होते, आदर्श पिता होते, आदर्श पती होते, अशा सर्वगुण संपन्न प्रभू श्रीरामाची रामकथा व रामायण नेहमी भारताच्या साहित्याला उत्कर्षाची प्रेरणा देत असते. आज भारता सोबत जगातील विविध देशांमध्ये प्रभू रामचंद्राविषयी एक वेगळा आदर असून देशासोबत जगामध्ये श्री राम नवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
प्रभू रामचंद्रांच्या त्यागाची, तपस्याची गरज समाजातील तरुण पिढीसाठी अत्यंत गरजेचे असून तरुण पिढीने प्रभू रामचंद्राच्या विचारावर चालणे आज काळाची गरज बनली आहे. पृथ्वीची निर्मिती ज्या ब्रह्मा, विष्णू, महेश या देवानी केली, त्यामधला विष्णूचा अवतार म्हणजेच प्रभू रामचंद्र ज्या ज्या वेळेस पृथ्वीवर अन्याय अत्याचार वाढले, अधर्म वाढला, त्या त्या वेळेस विष्णू देवताने विविध अवतार घेऊन धर्माची पुनरस्थापना केली आहे. म्हणूनच प्रभू रामचंद्राच्या जन्मदिनी आपण सर्वजण श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात साजरी करत असतो, असे मत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी व्यक्त केले.
यावेळी शिवशाहीर प्रा. अरविंद घोगरे, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष कल्याणराव पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजय मामा पाटील,उपसरपंच सोनू माळी, सरपंच विजयकुमार आंबेकर, उपसरपंच बालाजी भोसले, शिवसेना तालुकाप्रमुख कैलास पाटील, नाना धुपे,राहुल कोरे, शिवशंकर धुपे, एडवोकेट दत्ताजी भोसले, विकी भोसले, बंडू पाटील आदींसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
