मादलापूर येथे अखंड हरिनाम सप्ताह आणि सर्व रोग निदान शिबिर संपन्न

मादलापूर येथे अखंड हरिनाम सप्ताह आणि सर्व रोग निदान शिबिर संपन्न

उदगीर (एल पी उगीले) उदगीर शहराचे उपनगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मादलापूर येथील दत्तनगर भागात असलेल्या समाधान हनुमान मंदिराच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या सात दिवसांमध्ये सकाळी चार वाजता काकड आरती, पारायण, भजन, ग्रंथ दिंडी, आणि ह. भ. प. विनोद जोशी महाराजांचे कीर्तन, महाआरती असे भरगच्च कार्यक्रम संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी मादलापूरचे सरपंच उदयसिंह मुंडकर, श्रीमंत दादा सोनाळे, दत्त मंदिर येथील समाधान हनुमान मंदिराच्या कमिटीचे सदस्य बालाजी सोनाळे, रामराव मोरे, संजय शिवशेट्टे, मारुती सांडवे, वाघमोडे, बिरादार आणि महिला भजनी मंडळ यांचे प्रमुख आशा पाटील यांनी अखंड हरिनाम सप्ताह यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेऊन, सांगता केली. याप्रसंगी मादलापूर परिसरातील जनतेचे आरोग्य सुदृढ राहावे, म्हणून सोनाई हॉस्पिटल तर्फे सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचाही लाभ परिसरातील अनेक भाविक भक्तांनी घेतला.

About The Author

error: Content is protected !!