शिरुर ताजंबद शाखेतील अठरा सोसायटी पैकी उमरगा यल्लादेवी,उमरगा कोर्ट,तेलगाव या मोठ्या सोसायटी सह दहा सोसायटीची वसुली शंभर टक्के

बँकेची वसुल पात्र ४४२४.८४ कोटी पैकी ४२८२.८४ कोटी रुपये वसुली

अहमदपूर ( गोविंद काळे )लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा शिरुर ताजबंद मार्फत अठरा सोसायट्यांना कर्जवाटप करण्यात आले त्यापैकी उमरगा यल्लादेवी,उमरगा कोर्ट व तेलगाव या मोठ्या संस्थेसह दहा सोसायटींची वसुल पात्र रक्कमेची शंभर टक्के वसुली झाल्याची माहीती अहमदपूर तालुका फिल्ड आॅफीसर रामदास देशमुख यांनी दिली.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा शिरुर ताजबंद मार्फत कार्यक्षेत्रातील अठरा सोसायट्यां मार्फत सन२०२१-२२ सालात ६२०० शेतकर्‍यांना कर्ज ४५,००,००,००० कोटी रुपये कर्ज पुरवठा करण्यात आला होता.बँकेच्या वसुल पात्र रक्कम ४४२४.८४ कोटी रुपये अठरा सोसायट्यांकडे होती.त्यापैकी सोसायट्यांनी वसुल पात्र रक्कमेकी ४२८२.८४ कोटी रुपये ९६.७९ % बँक स्तरावर वसुली झाली आहे.
शिरुर ताजबंद शाखेतील वायगाव येथीव सोसायटीने बँक व सोसायटी स्तरावर २८४.२० कोटी रुपये शंभर टक्के वसुली दिली आहे.उमरगा यल्लादेवी ३४८.४२ कोटी रुपये,उमरगा कोर्ट ४०७.९३ कोटी रुपये,तेलगाव ४८३.६० कोटी रुपये,आजनी खु.१८०.८१कोटी रुपये,बोडका १७५.०५ कोटी रुपये,खरबवाडी-गादेवाडी २६३.२६ कोटी रुपये,कोकणगा १९२.११कोटी रुपये,मुळकी १७९.५९ कोटी रुपये,वळसंगी २०९.५९ कोटी रुपये वरिल दहा सोसायटी मार्फत बँक स्तरावर शंभर वसुली करण्यात आली.
शंभर वसुली न झालेल्या शिरुर ताजबंद,आंबेगाव,चोबळी,मेथी,जवळगा,माकणी,मांडणी व सय्यदपूर या सोसायट्यांची एप्रिल अखेर पर्यंत शंभर टक्के वसुली होईल व त्या दृष्टीने बँक व सोसायटीच्या वतीने नियोजन केल्याची माहीती अहमदपूर तालुका फिल्ड आॅफीसर रामदास देशमुख यांनी माहीती सांगीतली.
सोसायटीची शंभर टक्के वसुली होण्यासाठी अहमदपूर तालुका फिल्ड आॅफीसर रामदास देशमुख,शाखाधिकारी शिवशंकर बेद्रे ,शाखातपासणीस अतूल देशमुख व पांडुरंग चाकुरकर व बँकेच्या कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.
बँक व सोसायटी स्तरावर वसुली झालेले वायगावचे चेअरमन दिनानाथ राचमाले,मुळकीचे चेअरमन विजयकुमार लोहारे,उमरगा कोर्टचे चेअरमन सदाशिव जगताप,तेलगावचे चेअरमन दिनकर जाधव,उमरगा यल्लादेवी-फुलसेवाडीचे चेअरमन राजकुमार सोमवंशी,आजनीचे चेअरमन विलास सप्रे,बोडका चेअरमन धनाजी कानवटे,कोकणगा शिवशंकर कच्छवे,खरबवाडी-गादेवाडीचे चेअरमन नारायण पवार,वळसंगी चेअरमन प्रदीप कलमे सबंधित गावाचे गटसचिव गोविंदराव सुर्यवंशी, राजू चेवले ,राजकुमार जगताप,सुनिल माकणीकर,संतोष होनराव,गोविंद तांबळगे, हरिभाऊ नागमोडे यांचे लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा आमदार बाबासाहेब पाटील ,तालुका फिल्ड आॅफीसर रामदास देशमुख यांनी अभिनंदन केले.
————————————————————————
शेतकर्‍यांच्या व सोसायटी संचालकांच्या सहकार्यामुळेच उमरगा यल्लादेवी- फुलसेवाडी सोसायटीची ,सोसायटी स्तरावर शंभर टक्के वसुली झाली असून वेळोवेळी तालुका फिल्ड आॅफीसर रामदास देशमुख,शाखाधिकारी शिवशंकर बेद्रे ,शाखा तपासणीस अतूल देशमुख, पांडुरंग चाकुरकर यांचे मार्गदर्शन सहकार्य लाभल्याने बँकस्तरावर शंभर टक्के वसुली झाली असली तरी सर्वांच्या सहकार्याने सोसायटी स्तरावर शंभर टक्के वसुली करण्याचा मनोदय उमरगा यल्लादेवी फुलसेवाडीचे चेअरमन राजकुमार सोमवंशी यांनी बोलून दाखवले.

About The Author

error: Content is protected !!