आमच्या कार्यप्रणालीचा विचार करून विधानसभा मतदारसंघातील जनतेने मला ३० हजाराच्या मताधिक्याने विजयी केले- आ. बाबासाहेब पाटील

आमच्या कार्यप्रणालीचा विचार करून विधानसभा मतदारसंघातील जनतेने मला ३० हजाराच्या मताधिक्याने विजयी केले- आ. बाबासाहेब पाटील

बारामतीच्या धर्तीवर मतदार संघाचा सर्वांगीण विकास करणार- आ. बाबासाहेब पाटील

अहमदपूर ( गोविंद काळे ) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा पवार साहेब, अजित दादा, माजी मंत्री बाळासाहेब जाधव,आणि आमची कार्यप्रणाली याचा सारासार विचार करून अहमदपूर- चाकूर विधानसभा मतदारसंघातील जनतेने मला ३० हजाराच्या मताधिक्याने (लीड) विजयी केले. मतदारांनी माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाला अजिबात तडा न जाऊ देता, माझे आद्य कर्तव्य समजून बारामतीच्या धर्तीवर अहमदपूर- चाकूर विधानसभेचा सर्वांगीण विकास करणार असे प्रतिपादन आ. बाबासाहेब पाटील यांनी केले. ते येथील पंचायत समिती प्रशासकीय इमारत व अधिकारी कर्मचारी वर्गासाठी निवासस्थान बांधकामाच्या भूमिपूजन सोहळा प्रसंगी उद्घाटन पर भाषणात बोलत होते.
पंचायत समिती प्रशासकीय इमारत, अधिकारी वर्गासाठी निवासस्थान बांधकामाचे भूमिपूजन आ. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते दिनांक २६ रोजी करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जि ल्हासरचिटणीस साबजी महाजन तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांची प्रमुख उपस्थिती होती. व्यासपीठावर शिवानंद हेंगणे, चंद्रकांत मद्दे, शिवाजीराव देशमुख, ॲड. भारत भूषण क्षीरसागर, निवृत्ती कांबळे, माधव जाधव, मीनाक्षी शिंगडे, सरपंच शिवाजीराव संपत्ते, सिराजोद्दीन जागीरदार, शिवाजी खांडेकर, बळीराम इंगोले, विकास महाजन, लक्ष्मीकांत कासनाळे, कार्यकारी अभियंता देशपांडे आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना आ. पाटील म्हणाले की गेले दोन अडीच वर्षात कोविडच्या काळात पाहिजे त्या प्रमाणात विकासाची कामे झालेली नाहीत. तो बॅकलॉग भरून काढण्यासाठी आम्ही संबंधित खात्याकडे प्रस्ताव दाखल करून, पाठपुरावा करून, विकासाची कामे मंजूर करून आणत आहोत. परंतु विरोधक बिनबुडाचे आरोप करून आम जनतेत गैरसमज पसरवण्याचे कार्य करत आहेत. आम्ही वेळप्रसंगी विकासाच्या कामासाठी पक्षाचे जोडे बाहेर ठेवून कार्य करतो. तुम्ही पण विकास कामासाठी स्पर्धा लावा, परंतु सुडाचे राजकारण करू नका. असा खरमरीत संदेश विरोधकांना देऊन या मतदारसंघातील सुजाण नागरिकांनी आपणास पण काम करण्याची संधी दिलेली होती. त्यावेळी आपणास झोपी येतात, अनेक वेळात गुंततात तर आम्ही जनतेच्या जीवनात परिवर्तन करण्याचे कार्य करत आहोत.
-:होय आमच्या संस्था आहेत:-
सध्या विरोधक तुमच्याकडे संस्था आहेत म्हणून बोलबाला करतात, तर मी छातीठोकपणे सांगू इच्छितो की आमच्याकडे शैक्षणिक संस्था आहेत, कारखाना आहे, दूध डेअरी आहे. या संस्थेत आणि कारखान्यात शकडो कर्मचारी आहेत, त्यांच्या जीवनात आर्थिक प्रगती झाली आहे. त्यांची मुले उच्च शिक्षण घेऊन मोठ्या हुद्द्यावर विराजमान झाले आहेत. त्यांचे कुटुंब सक्षम बनले आहे. आम्ही सदैव गरजूंना काम देण्याचे काम करत आहोत आणि पुढील काळात आणखीन संस्था काढणार असल्याचे सांगून टेक्निकल इन्स्टिट्यूट, क्रीडा क्षेत्राला बळकटी देण्याचा मानस व्यक्त केला. तसेच मतदाराला पुढे घेऊन जायचे आहे, सौर उर्जेवर प्रकल्प राबवायचे आहेत, गोरगरिबांना घरकुल, विहिरीचे काम करायचे आहे. यात एखादे विकासाचे काम कमी होईल परंतु तुमच्यासारखे जातीय राजकारण करणार नाही असे ठणकावून सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी चोपणे यांनी केले तर आभार चंद्रशेखर भालेराव यांनी मानले.

About The Author

error: Content is protected !!