अहमदपूरात रामजन्म उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

अहमदपूरात रामजन्म उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

खासदार सुधाकर श्रृंगारे यांची उपस्थिती

अहमदपूर( गोविंद काळे ) प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अहमदपुरात रामजन्म उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
शहरातील थोडगा रोडवरील श्रीराम मंदिरात रामजन्म उत्सव हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
अहमदपूर शहरा सह तालुक्यात राम जन्म उत्सवा निमित्ताने श्रीरामाचे मोठमोठी होर्डिंग्ज व भगवे झेंडे,पताके लावल्याने सर्वत्र भगवेमय वातावरण निर्माण झाले होते. अहमदपुर शहरात व शिंदगी बु.येथील रामजन्म उत्सवाच्या कार्यक्रमात लातूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुधाकर श्रृंगारे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख, माजी नगराध्यक्ष अँड. भारत चामे, देवेंद्र देवणीकर, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंदराव गिरी, माजी नगरसेवक धनंजय जोशी, नगरसेवक राहुल शिवपुजे, रामभाऊ बेल्लाळे, अँड.अमित रेड्डी, नंदकुमार कोनाळे, अँड.किशोर कोरे, गणेश हालसे, अँड.निखील कासनाळे, यांच्या सह रामजन्मोउत्सव समितीचे पदाधिकारी, रामभक्त स्त्री, पुरुष , युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

About The Author

error: Content is protected !!