अहमदपूर ( गोविंद काळे) महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या एम के सी एल अर्थात ओलंपियाड स्पर्धा परीक्षेत यशवंत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक भरारी घेऊन यशाची परंपरा कायम केल्याने त्यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.
यात आठव्या वर्गातील कुमारी दाचावार ज्ञानदा राम लातूर जिल्ह्यात सर्वप्रथम येऊन 2500 रुपये रोख,कुमारी पुणे वैष्णवी गंगाधर ही द्वितीय येऊन पंधराशे रुपये रोख,केंद्रे स्वप्नील संग्राम हा सर्व तृतीय येऊन एक हजार रुपये रोख,नववीतील केंद्रे ओंकार संतोष हा प्रथम येऊन अडीच हजार रुपये रोख, कानडे आर्यन रामराज हा द्वितीय येऊन पंधराशे रुपयेरोख, मुंडे आदित्य अशोक हा सर्व तृतीय राहून एक हजार रुपयेरोख, तर वर्ग सहावीतून झुकुले वेदांत लालबा लातूर जिल्ह्यात प्रथम येऊन अडीच हजार रुपये रोख, सातवीतून उगीले नैतिक ज्ञानोबा द्वितीय येऊन पंधराशे रुपये रोख, सातवीतून तिडके स्वराज अरुण सर्व तृतीय येऊन हजार रुपये रोख, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन मुख्याध्यापक व्ही व्ही गंपले, यांच्या हस्ते प्रार्थनेमध्ये सत्कार करण्यात आला.
यावेळी उपमुख्याध्यापक उमाकांत नरडेले, राम तत्तापुरे, रोहित इन्फोटेक चे संचालक उदय बेंबडे, अशोक पेदेवाड ,अरुण मोरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर व्ही पाटील यांनी तर आभार संतोष मालवदे यांनी मांनले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी यशवंत विद्यालयाच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.