महेश वाडीकर यांना राज्यस्तरीय महात्मा फुले समाजरत्न पुरस्कार जाहीर
अहमदपूर ( गोविंद काळे ) : श्री संत शिरोमणी सावता माळी सेवाभावी संस्था व महात्मा फुले ब्रिगेड महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिला जाणारा महात्मा फुले समाजरत्न पुरस्कार उमरगा(हा) गावचे सुपुत्र तथा डी, के, पाटील पब्लिक स्कुलचे उप प्राचार्य महेश शिवाजी वाडीकर यांना जाहीर झाला आहे.
महात्मा फुले यांच्या विचाराची क्रांती ज्योत सामाजिक जडणघडण उभारण्यासाठी महेश वाडीकर यांनी अमूल्य योगदान दिल्याने हा पुरस्कार यांना जाहीर झाला.शैक्षणिक , सामाजिक , प्रवचन व कीर्तनाच्या माध्यमातून अनिष्ट तालुक्यात व जिल्हयात एक वेगळा ठसा उमटवला आहे.
तसेच समाजातील गोरगरीब जनतेला मदतीचा हात देऊन विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रमात ते नेहमीच हिरीरीने सक्रिय सहभाग घेतात. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल श्री संत शिरोमणी सावता माळी सेवाभावी संस्था व महात्मा फुले ब्रिगेड महाराष्ट्र या सामाजिक व शैक्षणिक सेवाभावी संस्थेने घेऊनमहेश वाडीकर यांची राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कारासाठी निवड केली आहे, हा सन्मान नऊ एप्रिल वार रविवार रोजी लातूर येथे प्रदान करण्यात येणार आहे. हा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याने महेश वाडीकर यांचे समाजातील सर्व स्थरातून अभिनंदन केले जात आहे.
