लोक आग्रहास्तव दत्ता बामणे यांची बाजार समितीला उमेदवारी !

लोक आग्रहास्तव दत्ता बामणे यांची बाजार समितीला उमेदवारी !

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर तालुक्यातील गोरगरीब नागरिकांच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या अडी अडचणी साठी सतत धावून जाणारे युवा नेतृत्व दत्तात्रय आबासाहेब बामणे हे सतत लोकांच्या सेवेसाठी कार्यरत असतात. आज पर्यंत त्यांनी वाढवणा मोठ्या गावातील ग्रामपंचायत सरपंच, सदस्य तसेच पंचायत समितीचे सदस्य आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे संचालक म्हणून जनकल्याणाची विविध कामे केली आहेत. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली सविता दत्तात्रय बामणे यांनी देखील वाढवणा गावच्या सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य म्हणून उल्लेखनीय कार्य केलेले आहे, करत आहेत. या त्यांच्या कामाचा आवाका विचारात घेऊन परिसरातील नागरिकांनी अट्टाहास करून त्यांना उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सोसायटी मतदारसंघातून संचालक पदासाठी उमेदवारी जाहीर करण्याची मागणी केल्यामुळे दत्तात्रय बामणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेस पक्षाचे आणि विशेषतः लोकनेते माजी आमदार चंद्रशेखर भोसले यांचे निकटवर्ती म्हणून त्यांची उदगीर विधानसभा मतदारसंघात चांगली ओळख आहे. जनतेचे प्रश्न शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून सोडवण्याचा त्यांना चांगला अनुभव आहे. पक्ष संघटन वाढीसाठी त्यांनी यापूर्वीही भरपूर कार्य केलेले आहे. त्या कामाची दखल घेऊन त्यांना काँग्रेस पक्षातर्फे संधी दिली जाईल, अशी अपेक्षा कार्यकर्ते करत आहेत.

About The Author

error: Content is protected !!