बहुजनांच्या शिक्षणासाठी संस्था उभारणे ही अभिमानाची गोष्ट – भाऊराव कह्राडे

बहुजनांच्या शिक्षणासाठी संस्था उभारणे ही अभिमानाची गोष्ट - भाऊराव कह्राडे

उदगीर (एल.पी.उगीले) : किसान शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना ज्या उदात्त हेतूने झाली, ते ऐकून अभिमान वाटला. दीन- दलित, शेतकऱ्यांच्या ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाची दारे यामुळे खुली झाली. अशा शिक्षण संस्थेमुळेच मी इथपर्यंत येऊ शकलो. बहुजनांच्या शिक्षणासाठी संस्था उभी करणे अभिमानाची गोष्ट आहे असे उद्गार बबन, खाडा, पीडीएम चित्रपटाचे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक भाऊराव कह्राडे यांनी काढले.
येथील शिवाजी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या युवा स्पंदन वार्षिक स्नेहसंमेलन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील होते, तर प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम, नायिका कालिंदी निस्ताने, नायक पृथ्वीराज थोरात ,गायक ओंकारस्वरूप बागडे, नायिका शितल पाटील, सहकलाकार सुनील बागडे, संगीता बागडे, इंद्रभान करे हे उपस्थित होते. तर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सचिव ज्ञानदेव झोडगे, कोषाध्यक्ष नामदेव चामले, सहसचिव जहागीरदार पाटील, सदस्य पृथ्वीराज पाटील, विशाल पाटील, अजित पाटील, प्राचार्य डॉ. विनायक जाधव ,उपप्राचार्य डॉ. आर एम मांजरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा व्ही आर भोसले ,पर्यवेक्षक जी जी सूर्यवंशी, ग्रंथपाल व्ही एम पवार, संयोजक व्ही डी गायकवाड, प्रबंधक बी के पाटील, पी डी माने, विद्यार्थी प्रतिनिधी गर्जे प्रगती, पाटील कामाक्षी यांची होती. पुढे बोलताना कह्राडे म्हणाले, विद्यार्थी मित्रांनो चित्रपट पाहताना तुम्हाला खूप आनंद होत असतो. परंतु त्याची निर्मिती करणे खूप अवघड असते. अशा कठीण परिस्थितीतून मी हे काम केले, त्याची दखल आपण घेतल्यामुळेच मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. यावेळी पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी प्रशासकीय कामातील अनुभव सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमुळे, कार्यामुळे देश सुरळीत चालत आहे, असेही म्हटले. प्राचार्य डॉ. विनायक जाधव यांनी आपल्या मनोगतातून महाविद्यालयाच्या प्रगतीचा अहवाल सादर केला. यावेळी अजित पाटील तोंडचिरकर, नायक पृथ्वीराज थोरात, नायिका कालिंदी निस्ताने, नायिका ,शितल पाटील ,सुनील बागडे यांनी आपल्या कार्याचे अनुभव कथन केले तर गायक ओंकारस्वरूप बागडे यांनी अनुभव कथनासोबत बबन चित्रपटातील गीत सादर केले. यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणावर निवड झालेले डॉ. व्ही एम पवार ,डॉ एल एच पाटील,डॉ कुलकर्णी एच डब्ल्यू, डॉ एस व्ही चाटे ,डॉ एम एन शेख,डॉ आर एम मांजरे ,डॉ एस व्ही शिंदे ,प्रा बालाजी सूर्यवंशी यांचा सत्कार केला. तर पीएचडी प्राप्त डॉ. ए एस टेकाळे, डॉ. पी डी माने ,डॉ संजय पाटील यांचाही सत्कार केला. त्यासोबतच आयकवेसीचे समन्वयक डॉ ए एम नवले यांचाही सत्कार केला. विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात केलेल्या अनमोल कामगिरीमुळे त्यांचाही सत्कार करण्यात आला. एनएसएस मधील कामगिरीबद्दल पाटील कामाक्षी ,लोहकरे सारंग, कांबळे अर्जुन, टेकाळे आदित्य यांचा ,आनंद नगरी स्टॉल मधील हालापुरे कविता, गणेश जाधव, तेजस्विनी शिंदे, जीवन बिरादार,शरद तसेच सांस्कृतिक विभाग लोकनृत्य ,क्रीडा विभागातील बास्केटबॉल ,फुटबॉल ,बेसबॉल विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या योगदानाबद्दल त्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. एमकॉमची विद्यार्थिनी श्वेता सारडा विद्यापीठातून प्रथम आल्याबद्दल व बीकॉमची विद्यार्थिनी तेगमपुरे तनुजा द्वितीय आल्याबद्दल तसेच विद्यापीठातील युवक महोत्सवात मनोज झुंगाने अनेक पारितोषिके संपादन केल्याबद्दल त्यांचे सत्कार करण्यात आले .ग्रंथालय विभागातील निबंध स्पर्धेसाठी, ग्रंथ वाचनासाठी ,जीवशास्त्र विभागातील स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. स्नेहसंमेलनात संगीत शेलापागोटे, सांस्कृतिक कार्यक्रम असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्नेहसंमेलनाचे संयोजक डॉ. व्हि डी गायकवाड यांनी सूत्रसंचालन प्रा बालाजी सूर्यवंशी यांनी तर आभार डॉ डी बी कोणाळे यांनी मानले .या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी ,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वांनी मेहनत घेतली.

About The Author

error: Content is protected !!