तोंडार महसूल मंडळ विभागाच्या शेतकऱ्यांची बैठक
उदगीर (एल पी उगीले) : उदगीर तालुक्यातील महसूल विभाग तोंडार अंतर्गत येणारे गाव कल्लुर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीरा मध्ये बैठक संपन्न झाली.यात लातुर जिल्ह्यातील सर्व गाव नकाशा वरील शेतरस्ते अतिक्रमणमुक्त अभियान जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.यांच्या संकल्पनेतून उदगीर उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार रामेश्वरजी गोरे,हे बैठकीला उपस्थित होते.यावैळी तोंडार महसूल मंडळातील शेतकरी यांना शेत रस्त्याबाबत एकेरी रेषा,दुहेरी रेषा, वहिवाटीतील रस्ते,तसेच शिवरस्ते याबाबत माहिती व महत्त्व सांगण्यात आले. आपले गाव शेत रस्ते अतिक्रमण मुक्त करावे, तसेच याबाबत कांही अडीअडचणी येत असतील तर तोंडार महसूल मंडळ अधिकारी व आपल्या सज्जाचे तलाठी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवहान तोंडार मंडळ अधिकारी संतोष चव्हाण यांनी केले.आपल्या अडचणीचे निरसन तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येईल असे सांगितले. तोंडार मंडळातील कल्लुरचे सरपंच लक्ष्मण कुंडगीर, माजी सरपंच बब्रुवान कुंडगीर निवृत्ती बाजगीर,व्यंकटराव पाटील,बाबुराव सुरनर, मधुकर आमगे, पोलीस पाटील कल्लुर, बन्सीधर पाटील, भालचंद्र शेळके पोलीस पाटील डोंगरशेळकी,ग्रामसेवक सुर्यवंशी, तोंडारचे तलाठी बाबासाहेब कांबळे, कल्लुरच्या तलाठी सोनाली पकाले, डोंगरशेळकी तलाठी दत्तात्रय मोरे, तोंडार मंडळातील सर्व तलाठी उपस्थीत होते.
