विश्व गुरुकुल प्री प्रायमरी स्कूलने उदगीरच्या शैक्षणिक परंपरेला साजेसे काम केले- राहुल केंद्रे

विश्व गुरुकुल प्री प्रायमरी स्कूलने उदगीरच्या शैक्षणिक परंपरेला साजेसे काम केले- राहुल केंद्रे

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर शहराच्या शैक्षणिक परंपरेचा नावलौकिक मोठा आहे. त्यात आपलाही वाटा म्हणून विश्व गुरुकुल प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल या शाळेने मोठा वाटा उचलला आहे, गुणवत्तेचे माहेरघर म्हणून ही शाळा ओळखली जात आहे. असे विचार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी व्यक्त केले.ते विश्वगुरू प्री प्रायमरी इंग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. या स्नेहसंमेलनाच्या उद्घाटक म्हणून जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे या होत्या, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मलकापूरचे लोकनियुक्त सरपंच गुरुनाथ अण्णा बिरादार हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. माधव चेंबूले, उपसरपंच महबूब शेख, संस्थेच्या अध्यक्षा ललिताताई कप्ते, शिक्षण विस्तार अधिकारी दिलीप हेबतपुरे, तसेच पालक प्रतिनिधी म्हणून पत्रकार सचिन शिवशेट्टे, मनोहर लोहारे, वैजनाथ गिरी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना राहुल केंद्रे म्हणाले की, कोणताही राजकीय किंवा शैक्षणिक वारसा नसताना देखील कप्ते परिवाराने शिक्षण क्षेत्रात, विशेषतः गुणवत्तेच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या परिश्रमामुळेच ही शाळा नावलौकिक मिळवत आहे.शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये मुलगा किंवा मुलगी असा कोणताही मतभेद निर्माण होईल असे वर्तन कोणी करू नये. लिंग भेद बाजूला ठेवून मुलींना देखील शैक्षणिक क्षेत्रात पुढे नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव सचिन कप्ते यांनी केले. याप्रसंगी पालक प्रतिनिधी म्हणून पत्रकार सचिन शिवशेट्टे यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसरपंच नंदकुमार पटणे यांनी तर आभार प्रदर्शन उदय कप्ते यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शालेय कर्मचाऱ्यांनी व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!