डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व रोग निदान शिबिर
उदगीर (एल.पी.उगीले) : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त विद्यार्थी जयंती महोत्सव समिती उदगीरच्या वतीने मोफत सर्व रोग निदान शिबिर घेण्यात आले.
प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती महोत्सव निमित्त मुंढे हॉस्पिटल येथे मोफत सर्व रोग निदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये मोफत हाडातील कॅल्शियमची तपासणी, फुफुसाची ताकद मोजण्याची तपासणी, हदयरोग तपासणी, मधुमेह तपासणी, रक्ताची मोफत तपासणी डॉ. श्रीकांत मुंढे, डॉ. विजय बिरादार, डॉ.सौ. सुयशा मुंढे यांनी केले. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून विजय निटुरे, हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सुशीलकुमार शिंदे, अतुल घोडके, अमोल शृंगारे हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष नितीन गायकवाड, उपाध्यक्ष कपिल शिंदे, कार्याध्यक्ष अतुल कांबळे, सचिव नरेश चांदे, राजकुमार माणसे, प्रफुल्ल कांबळे, सागर सोनकांबळे इत्यादींनी केले होते.
