बोरोळात कुस्तीचा फड रंगला मल्लांनी आनंद लोटला
देवणी (लक्ष्मण रणदिवे) : तालुक्यातील बोरोळ येथील लक्ष्मणनाथ – भिमनाथ महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळया निमित्त दि..६ रोजी कुस्ती स्पर्धेतील अंतिम लढत प्रसाद शिंदे उदगीर व प्रदीप गोरे रामलिंग मुदगड यांच्यात झाली. लक्षवेधी ठरलेल्या या लढतीत प्रसाद शिंदे यांनी प्रदीप गोरे यांस असमान दाखवत नाथ केसरीचा बहुमान पटकावला. तर दुसऱ्या क्रमांकासाठी दिपक सगरे भुसणी व गणेश काळे देवंग्रा ता.चाकूर यांच्यात झालेली ही लढत वेळेअभावी पंचानी बरोबरीत सोडत संयुक्त विजेते घोषीत केले. नाथ केसरी मंडळाच्या वतीने कुस्ती स्पर्धेचे आयोजन बोरोळात दरवर्षी करण्यात येत असते.कै यशवंतराव चव्हाण विद्यालयाच्या मैदानात गुरुवारी दुपारी दोन वाजता आयोजित कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र, कर्नाटकाच्या विविध भागातून जवळपास दोनशेहून अधिक मल्लानी सहभाग घेतला,त्यांच्याकडील डावपेचाच्या कौशल्याने विरोधी मल्लाना आसमान दाखवत उपस्थितांची वाहवा मिळवली. बोरोळ कर्नाटकाच्या सिमेलगत असलेले गाव असल्याने दोन्ही राज्यातील मल्लानी याठिकाणी मोठी गर्दी केली होती. अखेरच्या लढतीचा थरार तब्बल २५ मिनिटे चालला, प्रसाद शिंदे व प्रदीप गोरे यांच्यातील 11 हजार ५१रूपयासाठी झालेल्या या लढतीत शिंदेने बाजी मारत नाथकेसरीचा मानकरी ठरला.तर दिपक सगरे व गणेश काळे यांच्यात ९ हजारासाठी झालेली दुसऱ्या क्रमांकाची लढत ही बरोबरीत सोडविण्यात आली.यावेळी कै. यशवंतराव चव्हाण विद्यालय ते लक्ष्मणनाथ भिमनाथ महाराज यांच्या मठापर्यंत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.त्यानंतर विजेत्यास चषक रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.यावेळी पंच म्हणून नाथ केसरी मंडळांचे अध्यक्ष काशिनाथ शेंडगे,भरत कोयले,नाथ मंडळाचे अध्यक्ष माधव बालूरे, मारोती सिरसे,ज्ञानोबा देवणे,राजाराम हुंजे, ज्ञानोबा मुळखेडे, धोंडीबा मुळखेडे,राजकुमार शेंडगे,राहूल बालुरे,माधव थोटे, मुरली शेंडगे, अण्णाराव खोपे,पत्रकार जाकीर बागवान,देवणी खु गोविंद मेह्त्रे, माजी सैनिक यांनी काम पाहिले.
