मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते योजनेतून १२ कोटी ६० लक्ष तर मनरेगा योजनेतून ७० लक्ष असा एकुण १३ कोटी १० लक्ष रुपयाचा निधी मंजुर
उदगीर (एल.पी.उगीले) : महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभाग, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगा अंतर्गत ‘ मागेल त्याला काम आणि हवे ते काम ‘ यानुसार मनरेगा योजनेअंतर्गत लोकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावणे हा महाराष्ट्र रोजगार हमी योजनेचा वास्तविक उद्देश असून त्या अनुषंगाने ग्रामपंचायत मार्फत विविध कामाचे मागणी केल्यानंतर संबंधित कामास प्राधान्याने मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये उदगीर व जळकोट तालुक्यातील विविध गावातील विकास कामांसाठी महाराष्ट्र राज्याचे माजी ग्रामीण रोजगार हमी मंत्री आ.संजय बनसोडे यांच्या प्रयत्नाने ७० लक्ष रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे.यामध्ये उदगीर – जळकोट तालुक्यातील गावाकरीता निधी मंजुर करण्यात आला आहे. त्यामध्ये घोणसी ता.जळकोट या गावासाठी १० लक्ष रु. तर उदगीर तालुक्यातील तोगरी ता.उदगीर १० लक्ष रु, निडेबन गावातील सिमेंट रस्त्यासाठी ३० लक्ष रु, मादलापुर १० लक्ष रु, माळेवाडी १० लक्ष असे एकुण ७० लक्ष रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये सिमेंट काँक्रीट रस्ता किंवा पेव्हर ब्लाक करण्यात येणार आहे.
नियोजन विभाग रोजगार हमी योजनेतून मातोश्री ग्रामसमृद्धी शेतपालन रस्ते योजनेअंतर्गत उदगीर जळकोट तालुक्यातील विविध गावांमध्ये किलोमीटर प्रमाणे शेत पालन रस्ते मंजूर करण्यात आले असून यामध्ये शेत पाणंद रस्त्याची कामे पावसाळ्यात करणे अडचणीचे असते, त्यामुळे त्या कामांना खरीप हंगामाच्या काढणीनंतर सुरुवात केल्यास सदर पाणंद रस्त्याचे काम न थांबता पूर्ण करता येऊ शकतात. ही बाब विचारात घेऊन ज्या ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन आपल्या गावातील शेत पानंद रस्ते पूर्ण करण्याची तयारी दाखवली आहे, अशा गावातील शेत पाणंद रस्त्यांना शासनाने मंजुरी दिली असुन यासाठी आ.संजय बनसोडे यांनी मतदार संघातील आवश्यक गावांसाठी पाठपुरावा केला होता.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत उदगीर व जळकोट तालुक्यातील पाणंद रस्त्यांना मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते योजनेतून मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये हावरगा ता.जळकोट २ कि.मी. पाणंद रस्ता ४८ लक्ष , नावंदी ता .उदगीर २ कि.मी. पाणंद रस्ता ४८ लक्ष , करवंदी ता.उदगीर ०.५० कि.मी. पाणंद रस्ता १२ लक्ष , कल्लुर १ कि.मी. पाणंद रस्ता २४ लक्ष , कासराळ २ कि.मी. पाणंद रस्ता ४८ लक्ष, खेरडा खु. १ कि.मी. पाणंद रस्ता २४ लक्ष, गुत्ती ता.जळकोट १ कि.मी. पाणंद रस्ता २४ लक्ष, तोंडचिर ता. उदगीर २ कि.मी. पाणंद रस्ता ४८ लक्ष, तोंडार १ कि.मी. पाणंद रस्ता २४ लक्ष, नागलगाव १ कि.मी. पाणंद रस्ता २४ लक्ष, मल्लापुर १ कि.मी. पाणंद रस्ता २४ लक्ष, मोघा २ कि.मी. पाणंद रस्ता ४८ लक्ष, येवरी ता.जळकोट २ कि.मी. पाणंद रस्ता ४८ लक्ष, रुपला तांडा ता.जळकोट १ कि.मी. पाणंद रस्ता २४ लक्ष, लोणी ता.उदगीर २ कि.मी. पाणंद रस्ता ४८ लक्ष, शंभु उमरगा १ कि.मी. पाणंद रस्ता २४ लक्ष, हंगरगा २ कि.मी. पाणंद रस्ता ४८ लक्ष, होकरना ता.जळकोट १.५० कि.मी. पाणंद रस्ता ३६ लक्ष , माळहिप्परगा ता.जळकोट २ कि.मी. पाणंद रस्ता ४८ लक्ष, करडखेल ता.उदगीर १ कि .मी. पाणंद रस्ता २४ लक्ष, करवंदी १ कि.मी. पाणंद रस्ता २४ लक्ष, कल्लुर १ कि.मी. पाणंद रस्ता २४ लक्ष, कासराळ २ कि.मी. पाणंद रस्ता ४८ लक्ष, गुत्ती ता.जळकोट २ कि.मी. पाणंद रस्ता ४८ लक्ष, तोंडार ता.उदगीर २ कि.मी. पाणंद रस्ता ४८ लक्ष, तोंडचिर ता. उदगीर २ कि.मी. पाणंद रस्ता ४८ लक्ष, मल्लापुर २ कि.मी. पाणंद रस्ता ४८ लक्ष, मोघा २ कि.मी. पाणंद रस्ता ४८ लक्ष, येवरी ता.उदगीर २ कि.मी. पाणंद रस्ता ४८ लक्ष, रुपला तांडा ता.जळकोट १ कि.मी. पाणंद रस्ता २४ लक्ष, लोणी ता.उदगीर २ कि.मी. ४८ लक्ष , शंभु उमरगा ता. उदगीर १ कि.मी. पाणंद रस्ता २४ लक्ष, हंगरगा २ कि.मी. पाणंद रस्ता ४८ लक्ष, होकरना ता.जळकोट १.५० कि.मी. पाणंद रस्ता ३६ लक्ष रु., असे एकुण १२ कोटी ६० लक्ष रु. असे मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते योजनेतून १२ कोटी ६० लक्ष तर मनरेगा योजनेतून ७० लक्ष असा एकुण १३ कोटी १० लक्ष रुपयाचा निधी मंजुर करण्यात आला आहे.मतदार संघातील गावांसाठी विविध योजनेच्या माध्यमातुन वेगवेगळ्या विभागातुन कोट्यावधी रुपयाचा निधी माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांच्या प्रयत्नाने मंजूर झाल्याने सर्व सामान्य नागरीकांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. मतदार संघासाठी निधी उपलब्ध करुन दिल्याने रोजगार हमी मंत्री ना.संदिपान भुमरे यांचे आ.संजय बनसोडे यांनी आभार मानले आहेत.
