अंध विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी संपन्न

अंध विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी संपन्न

उदगीर (एल पी उगिले) : उदगीर येथील उदयगिरी लॉयन्स धर्मादाय नेत्र रुग्णालय अंतर्गत चालवण्यात येत असलेल्या अरुणा अभय ओसवाल रिसोर्स सेंटर फॉर ब्लाइंड येथे शिक्षण घेणाऱ्या अंध विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत, जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून त्यांची आरोग्य तपास करण्यात आली. लायन्स नेत्र रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. रामप्रसाद लखोटिया यांच्या मार्गदर्शनाखाली या अंध विद्यार्थ्यांची काळजी घेत त्यांना स्वावलंबी बनवण्याच्या दृष्टीने अरुणा अभय ओसवाल रिसोर्स सेंटर फॉर ब्लाइंड प्रयत्न करत आहे. यामध्ये उदयगिरी लायन्स धर्मादाय नेत्र रुग्णालयाचा सिंहाचा वाटा असून आपल्या पाल्याची जपवणूक करावी, तद्वत त्यांची काळजी घेतली जात असल्याचे विद्यार्थी सांगतात. या आरोग्य तपासणीसाठी डॉ. भाग्यश्री घाळे, योगेश चिद्रेवार, विजय पाटील यांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी सोबतच रक्ताची तपासणी तसेच शारीरिक व मन स्वास्थ्यासाठीही समुपदेशन केले. या आरोग्य तपासणीसाठी लॉयन्स क्लब उदगीर उमंग यांच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!